मेटा म्हणजे फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. फेसबुकवरही यूजर्स खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत, युजर्सना अधिक सुविधा देण्यासाठी आणि त्यांचा डेटा सुरक्षित करण्यासाठी फेसबूक आणखी नवीन सुविधा देत आहे. मात्र असं असतानाही फसवणूक करणारे युजर्सचा डेटा चोरण्यासाठी विविध युक्त्या वापरताना दिसून येत आहेत. आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये अनेक प्रकारचा डेटा जमा होत असतो. म्हणूनच तुमचा डेटा सुरक्षित करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुमचे Facebook खातं सुरक्षित करणं देखील महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण अनेक ठिकाणी आपले फेसबुक अकाउंट लॉग इन करतो आणि लॉगआउट करायला विसरतो. अशा परिस्थितीत कोणीतरी याचाच फायदा घेऊ शकतो. पण फेसबुक आपल्या युजर्सना एक सुविधा देत आहे, ज्यात तुम्ही तुमचं खातं कोणत्या ठिकाणाहून वापरलं जात आहे, हे जाणून घेऊ शकता. चला जाणून घेऊया कसं ते…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा