Sony PS VR2 launch : सोनीचे प्ले स्टेशन व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. चांगले गेमिंग अनुभव मिळत असल्याने सोनी प्ले स्टेशन गेमर्सना भूरळ घालते. दरम्यान सोनी प्लेस्टेशन व्हीआर २ हे २२ फेब्रुवारी २०२३ पासून बाजारत उपलब्ध होणार आहे. या हेडसेटची सुरुवातीची किंमत जवळपास ४५ हजार ४५४ रुपये असेल, असे कंपनीने बुधवारी ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले. बॉक्समध्ये हेडसेट, कंट्रोलर्स आणि स्टिरिओ हेडफोन्स मिळतील. चाहत्यांमध्ये या उपकरणाबाबत प्रचंड उत्सुक्ता आहे.
अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड आणि लक्झमबर्ग येथील गेमर्स १५ नोव्हेंबर रोजी प्लेस्टेशन व्हीआर २ साठी अधिकृत प्लेस्टेशन स्टोअरमध्ये प्रि-ऑर्डर करू शकतात. भारतात हा प्लेस्टेशन हडसेट कधी लाँच होणार या बद्दल माहिती उपलब्ध नाही.
(व्हॉट्सअॅप वेब सुरू नाही होत? ‘हे’ करून पाहा, समस्येपासून मिळू शकते सुटका)
प्लेस्टेशन हेडसेटचा वापर करण्यासाठी त्याला प्लेस्टशन फाइव्हशी जोडावे लागेल. या हेडसेटचे हार्डवर आणि डिजाईन अपडेट करण्यात आले आहे. नवीन डिजाईनची रंगसंगती प्लेस्टेशन फाइव्हशी जुळणारी आहे. प्लेस्टेशन व्हीआर २ मध्ये हेडबँडसारखे वायसर देण्यात आले आहे. हे पहिल्या पिढीच्या पीएस व्हीआरसारखे आहे, मात्र आकाराने छोटे आहे. गेमर्सना अद्ययावत २०००x२०४० पर आय डिस्प्ले रेझोल्युशन, आय ट्रॅकिंग आणि १२० एचझेड रिफ्रेश रेट अनुभवता येईल. हेडसेटमध्ये दोन सेन्स कंट्रोलर्स मिळतील.
पुढील वर्षी जेव्हा प्लेस्टेशन व्हीआर २ विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा तब्बल २० गेम्स उपलब्ध होतील, असे सोनीने पूर्वी सांगितले होते. या गेम्समध्ये ‘होरायझन कॉल ऑफ दे माउन्टेन’ आणि ‘रेसिडेंट इव्हिल व्हिलेज’ या गेम्सचा समावेश आहे.