Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्या कोणत्याही विषयाची माहिती हवी असल्यास आपण गुगलवर सर्च करतो. दक्षिण कोरियाने गुगलला ४२.१ अब्ज वॉन म्हणजेच तब्बल $३२ मिलियन म्हणजेच २ अब्जापेक्षा जास्त रकमेचा दंड ठोठावला आहे. दक्षिण कोरियाच्या अँटी ट्रस्ट रेग्युलेटरने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक या कमानीला हा दंड ठोठावला आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला व्हिडिओ गेम रिलीज करण्यापासून रोखण्यासाठी नियामकाने ही कारवाई केली आहे.
कोरियाच्या फेअर ट्रेड कमिशनने सांगितले, प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी गुगल मोबाईल App मार्केटचा वापर करत आहे. कोरियन नियामकाने Google LLC, Google Korea, Google Asia Pacific यांना मोबाइल गेम कंपन्यांना समर्थन देणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
Google ने कथितरित्या कोरियन प्लॅटफॉर्म प्रतिस्पर्धी वन स्टोअर कंपनीचा व्यवसाय विकास रोखण्याचा प्रयत्न केला. गूगलने कथित स्वरूपात NCSoft कॉर्प आणि Netmarble कॉर्पसह कोरियाच्या प्रमुख गेम कंपन्या, लहान कंपन्या आणि चिनी कंपन्याना गुगलच्या प्ले स्टोअर मध्ये आपले नवीन गेम रिलीज करण्यासाठी सांगितले. त्या बदल्यात गुगल आपल्या गेमची जाहिरात करत होते. Google च्या कृतीमुळे प्रभावित झालेल्या गेम निर्मात्यांमध्ये Netmarble, Nexon आणि NCSOFT तसेच इतर लहान कंपन्यांचा समावेश आहे, असे अँटीट्रस्ट रेग्युलेटरने म्हटले आहे.
हेही वाचा : गुगलला दणका; भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने ठोठावला १३३८ कोटींचा दंड, जाणून घ्या कारण
असे काम गुगलने जून २०१६ मध्ये सुरू केले होते, जेव्हा वन स्टोअर कोरियामध्ये सुरू झाले होते आणि ते एप्रिल २०१८ पर्यंत चालू होते. गुगलच्या या कृतीमुळे वन स्टोअरच्या नवीन गेमला आकर्षित करण्याच्या क्षमतेमध्ये अडचण निर्माण झाली व यामुळे त्याच्या विक्रीमध्ये घट देखील झाली. FTC च्या अंदाजानुसार, Google ने याद्वारे अंदाजे $१ .८ ट्रिलियनची विक्री केली.