अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) ने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. नासाने जगाला आगामी संकटाबद्दल चेतावणी दिली आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार हा धोका इतका भयंकर आहे की जगामध्ये क्वचितच कोणीतरी जिवंत राहील. नासाने सांगितले की, नासाने सांगितले की अॅस्ट्रोइड (अशनी) हा पृथ्वीकडे येत आहे. त्याला अॅस्ट्रोइड 2023 DW असे नाव देण्यात आले आहे.
तसेच नासाने सांगितले की, आम्ही २०२३ DW नावाच्या एका अॅस्ट्रोइडवर लक्ष ठेवून आहोत. जो २०४६ मध्ये पृथ्वीवर आढळण्याची शक्यता नाही आहे मात्र त्याचे इतर अनेक परिणाम पृथ्वीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्यांदा नवीन वस्तू सापडते तेव्हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि भविष्यात त्यांचा अंदाज लावण्यासाठी अनेक आठवडे लागतात असे नासा म्हणाले. नासाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑर्बिट विश्लेषक २०२३ DW चे परीक्षण करत राहतील आणि अधिक माहिती प्राप्त झाल्यावर आपले अंदाज व्यक्त करतील.
हेही वाचा : Disney + Hotstar च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; IPL आणि HBO बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
NASA ने केलेल्या घोषणेनुसार शास्त्रज्ञ सध्या २०२३ DW नावाच्या अॅस्ट्रोइडवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जो १४ फेब्रुवारी २०४६ रोजी पृथ्वीवर आढळण्याची शक्यता आहे. यातून निर्माण होणाऱ्या धोक्याची शक्यता कमी असली तरी शास्त्रज्ञ याच्याकडे एक आव्हान म्हणून बघत आहेत. अंतराळामधून अनेक प्रकारचे लघुग्रह सतत पृथ्वीजवळून जातात मात्र त्या सर्वांचा पृथ्वीला धोका नसतो. तसाच काही धोका होण्याची शक्यता असल्यास नासा जगाला अशा धोक्यांचा इशारा देत असते.