Three Steps To Take After Receiving A Scam Call : २०२४ मध्ये स्कॅम कॉल्स (Spam Call), स्कॅम मॅसेजचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. अगदी वर्क फ्रॉम होमची नोकरी ऑफर करण्यापासून ते डिलिव्हरी एजंटच्या रूपात वेश बदलून येऊन, तुमची पर्सनल किंवा सेन्सिटिव्ह माहिती तुमच्याकडून काढून घेतली जाते. या अशा स्कॅमर्सचे मुख्य उद्दिष्ट तुमचे पैसे आणि तुमची डिजिटल ओळख चोरणे हा असतो. तुमची फसवणूक होत आहे हे तुम्हाला कळल्यावर तुम्ही सावध झालात तरीही तुमचं काम तिथेच संपत नाही. तर तुमचं अकाउंट सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी, तुम्हाला पुढील तीन पायऱ्या फॉलो कराव्या लागतील…

नंबर रिपोर्ट करा :

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे

स्कॅमरचा फोन नंबर ब्लॉक केल्यानं त्यांना तुमच्याशी थेट संपर्क साधता येणार नाही. पण, जर त्या स्कॅमर्सपासून तुम्हाला इतरांनाही वाचवायचं असेल, तर त्या नंबरला रिपोर्टसुद्धा करा. त्यामुळे Truecaller सारख्या कॉलर आयडी ॲप या क्रमांकाला ‘स्कॅम’ (scam) म्हणून मार्क करतील. नंबर स्कॅम म्हणून चिन्हांकित करण्यासाठी त्यांच्या रिपोर्टिंग फीचरचा वापर करा. जेव्हा स्कॅमर इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे नंबर संशयास्पद (suspicious) म्हणून दर्शविले जातात. एसएमएस, व्हॉट्सॲप ॲप्ससुद्धा थेट संशयास्पद नंबर रिपोर्ट करण्यास अनुमती देतात. फक्त प्लॅटफॉर्मना नंबर तपासण्यासाठी आणि संभाव्यपणे क्रमांक डिसॅबल करण्यासाठी प्रॉम्प्ट करावे लागते. असे केल्याने तुम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित डिजिटल इको सिस्टीममध्ये योगदान देऊ शकता.

हेही वाचा…Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या

सतर्क राहा आणि तुमच्या अकाउंटचे निरीक्षण करा :

तुम्हाला स्कॅम कॉल (Spam Call) किंवा एसएमएस आला की, त्याच्याशी बोलण्यात गुंतून न जाण्याचा हा सर्वोत्तम सराव आहे. सतर्क राहा आणि कोणत्याही असामान्य वर्तनासाठी तुमची फायनान्शियल अकाउंट आणि डिजिटल ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करा. तुम्हाला काही संशयास्पद वाटल्यास, तुमच्या बँकेशी किंवा संबंधित ब्रॅण्डशी त्वरित संपर्क साधा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डची माहिती कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. तर त्याचे पासवर्ड ताबडतोब बदला आणि त्यातून काही संशयास्पद ॲक्टिव्हिटी आढळल्यास, क्रेडिट/डेबिट कार्ड रद्द करून, नवीन कार्ड घ्या. या दोन गोष्टी तुम्ही केल्याने तुमच्या स्कॅमरकडे असलेल्या माहितीचा त्याला काही उपयोग होणार नाही.

तुमचा पासवर्ड बदला :

एखाद्या स्कॅमरने OTP पाठविल्यास किंवा तुमच्या Amazon किंवा Facebook चे अकाउंट ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला असेल, तर अकाउंटचे पासवर्ड लगेच बदला. त्याशिवाय तुम्ही जिथे लॉग इन केले आहे, त्या सर्व डिव्हायसेसमधून लॉग आउटदेखील करू शकता . आवश्यक असल्यास नवीन पासवर्ड वापरून पुन्हा लॉगिन करू शकता.

तुम्ही तुमच्या अकाउंटसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सेट केले नसल्यास, ते करण्याची ही योग्य वेळ आहे. एखाद्या कंपनीच्या सर्व्हिसवर अवलंबून राहण्यापेक्षा एक तर OTP सेट करा किंवा ऑथेंटिकेशन ॲप वापरा. त्यामुळे एखाद्या स्कॅमरला तुमचा पासवर्ड ॲक्सेस मिळाला तरीही ते वन-टाइम पासवर्डशिवाय ते ॲक्सेस करू शकणार नाहीत.

Story img Loader