सध्या देशभरात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. सध्या सर्वत्र जास्त प्रमाणात उन्हाळा आहे. सकाळी १० च्या नंतर रस्त्यावर चालताना सुद्धा उन्हाच्या झळा लोकांना बसत आहेत. मात्र अजून खरा उन्हाळा चालू होयचा आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक नागरिक घरामध्ये AC , Cooler अशी साधने बसवतात. ज्यापासून तुम्हाला गार वारा मिळतो आणि कडक उन्हापासून दिलासा मिळतो.

एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त वेळ बाहेर जात येत नाही. मात्र घरात सुद्धा जर हवा येण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्यास उन्हाचा त्रास जाणवू शकतो. जर का तुमच्या घरामध्ये खिडकी योग्य दिशेला नसेल किंवा योग्य व्यवस्था नसेल ,तसेच खिडकी आहे पण खोली मोठी असल्याने ती पुरत नसेल तर तुमच्यासाठी स्प्लिट एसी योग्य आहे. स्प्लिट एअर कंडिशनर्स अलीकडच्या काळामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. कारण ते विंडो एसीच्या तुलनेत खूप जास्त फायदा देतात. मात्र त्याचे जसे काही फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. आज आपण स्प्लिट एसीचेफायदे आणि तोटे या विषयी जाणून घेऊयात.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

हेही वाचा : Air Conditioner Difference: नवीन AC खरेदी करताय? जाणून घ्या इन्व्हर्टर एसी आणि नॉन इन्व्हर्टर एसीमधील फरक

स्प्लिट एसीचे फायदे

स्प्लिट एसीला विंडो एसीपेक्षा जास्त ऊर्जा देईल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले असते. हे स्पिलत एसी कमी वीज वापरतात. तसेच खोली आकाराने मोठी असली तरी देखील चांगल्या पद्धतीने खोली गार करतात.

स्प्लिट एसी हे विंडो एसीसारखे आवाज करत नाहीत. याचे डिझाईन त्या पद्धतीने करण्यात आलेले असते. ज्यामध्ये एसीचा कंप्रेसर, कंडेन्सर युनिट खोलीच्या बाहेर ठेवण्यात येते. म्हणजेच यामुळे तुम्हाला झोपताना एसीच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

स्प्लिट एसी हे विंडो एसीपेक्षा भिंतीवर लावण्यास सोपे असतात. तो लावण्यासाठी आपल्या खोलीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त इनडोअर आणि आउटडोअर युनिट्स जोडण्यासाठी एक लहान छिद्र ड्रिल करावे लागेल. त्यानंतर तुम्ही स्प्लिट एसीच्या थंडपणाचा आनंद घेऊ शकता.

स्प्लिट एसी हा चांगल्या पद्धतीने एअर फिल्टरेशन सिस्टिमसह येतात. जे हवेतील धूळ, ऍलर्जी आणि इतर प्रदूषक काढू शकतात.

हेही वाचा : चारधामला जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! Reliance Jio ने लॉन्च केले 5G नेटवर्क; मिळणार ‘हा’ फायदा

स्प्लिट एसीचे तोटे

स्प्लिट एसी सामान्यतः विंडो युनिटपेक्षा महाग असतात. कारण तो बसवण्यासाठी खर्च जास्त प्रमाणात येतो.

विंडो युनिट्सच्या विपरीत, स्प्लिट एसीसाठी प्रोफेशनल पद्धतीने इन्स्टॉलेशनची गरज असते.

स्प्लिट एसी एकाच बसवलेले असतात. त्यामुळे ते सहजपणे एका बाजूने दुसरीकडे हलवता येत नाहीत. म्हणजेच याचा अर्थ असा की जर तुम्हाला घराच्या वेगवेगळ्या खोल्या गार करायच्या असतील तर तुम्हाला अनेक वेगवेगळे युनिट्स बसवावे लागतील.

स्प्लिट एसीची नियमित देखभाल करावी लागते. यामध्ये तुम्हाला फिल्टर साफ करावे लागतात. तसेच युनिटचे सर्व्हिसिंग समाविष्ट आहे. एसी स्प्लिटचे सर्व्हिसिंग नियमित न केल्यास त्याचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो व बिजबिल देखील जास्त येऊ शकते.