स्पॉटिफाय (Spotify) ने यूजर्ससाठी एक शानदार ऑफर आणलं आहे. स्पॉटिफाय प्रीमियम सदस्यता भारतात सहा महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. खरं तर, अॅमेझान इंडियाने (Amazon India) आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत ते आपल्या प्लॅटफॉर्मवर निवडक खरेदीदारांना सहा महिन्यांपर्यंत स्पॉटिफाय प्रीमियम सदस्यता मोफत देत आहे. तुम्ही देखील गाणी ऐकण्यासाठी शानदार प्लॅटफॉर्म शोधत असाल तर स्पॉटिफायची ही ऑफर तुम्हालाच नक्कीच आवडेल. ही ऑफर ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत खरेदीदारांसाठी उपलब्ध असेल.
काय आहे Spotify Premium Offer?
अॅमेझान इंडियाच्या या ऑफर अंतर्गत खरेदीदारांनी ई-रिटेल प्लॅटफॉर्मवर टॅब्लेट, लॅपटॉप, मोबाईल डिव्हाइसेस, स्पीकर, हेडफोन आणि ऍक्सेसरीज यांसारखी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केल्यास त्यांना Amazon वर मोफत Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. पण ऑफरमध्ये एक अट देखील आहे. म्हणजेच, Amazon ने आपल्या सपोर्ट पेजवर लिहिले आहे की, ही ऑफर फक्त अशा ग्राहकांना दिली जाईल ज्यांनी Amazon India मध्ये ईमेल ID नोंदणीकृत आहे आणि ज्यांनी यापूर्वी Spotify Premium च्या मोफत ट्रायलचे सदस्यत्व घेतलेले नाही.
कंपनीने म्हटले आहे की, पात्र ग्राहकांना याचा लाभ मिळेल. म्हणजे तीन किंवा सहा महिन्यांसाठी Spotify प्रीमियमच्या वैयक्तिक प्लॅनचा मोफत प्रवेश जो त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर १५ डिसेंबर २०२२ पर्यंत व्हाउचरच्या स्वरूपात पाठवला जाईल. Amazon India ने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाईल डिव्हाइसेस आणि ऍक्सेसरीज, हेडफोन्स आणि स्पीकरची खरेदी किंमत १,००० रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ५,००० रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना तीन महिने मोफत मिळेल. म्हणजेच Spotify प्रीमियम सदस्यता उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे, ज्या ग्राहकांचे लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाइल उपकरणे आणि ऍक्सेसरीज, हेडफोन आणि स्पीकरची खरेदी किंमत ५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना स्पॉटीफाय प्रीमियमचे सहा महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.