लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअॅप कायमच वापरकर्त्यांसाठी नव-नवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. आता व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर आले असून हे नवीन फीचर स्टेटसशी संबंधित आहेत. व्हॉट्सअॅप स्टेटसचे हे फीचर इंस्टाग्रामसारखेच आहे. तुम्हाला अॅपमध्ये स्टेटससाठी वेगळा विभाग मिळत असला तरी आता तुम्ही यूजर्सच्या चॅटवर इतर कोणत्याही यूजरचा स्टेटस पाहू शकणार आहात. त्याचे अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. या अपडेटनंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप यूजर्सच्या प्रोफाइल फोटोवर स्टेटस चिन्हही दिसेल.

हे अॅप अनेक दिवसांपासून बीटा व्हर्जनवर या फीचर्सची चाचणी करत होते. याशिवाय इतरही अनेक नवीन फीचर्स अॅपमध्ये जोडण्यात आले आहेत. यामध्ये ग्रुप कॉलिंग लिंक्स आणि स्टेटस इमोजी रिप्लाय समाविष्ट आहेत. अॅपलने iOS वापरकर्त्यांसाठी स्टेटस रिअॅक्टचे नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. हे फीचर अँड्रॉइड यूजर्ससाठी आधीच उपलब्ध होते.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Sushma Swaraj And Manmohan Sing News
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा

आणखी वाचा : गुगलने जोडले जीमेलवर नवीन फीचर्स; आता तुमचे काम होतील झटक्यात पूर्ण!

इतर अनेक नवीन फीचर्स लवकरच अॅपवर येणार आहेत. युजर्सना लवकरच कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअरिंगचा पर्यायही मिळेल. त्याच वेळी, अॅपमध्ये व्ह्यू वन्स मोडमध्ये पाठवलेल्या फोटोंचे स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याची तयारी देखील आहे. या वैशिष्ट्यामुळे, पाठवलेल्या संदेशाचा स्क्रीनशॉट व्ह्यू ओन्स मोडमध्ये घेता येणार नाही.

तसे, हे वैशिष्ट्य काही काळापूर्वी बीटा आवृत्तीमध्ये दिसून आले होते. तुम्ही युजरच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करताच, त्या यूजरची स्टेटस तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेटस सेट केलेल्या वापरकर्त्याच्या प्रोफाइल फोटोभोवती हिरवे किंवा निळे वर्तुळ दिसेल.

Story img Loader