व्हॉट्सअ‍ॅप हे एक प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. सध्याच्या घडीला असा एकही स्मार्टफोन युजर नसेल ज्याच्या फोनमध्ये हे अ‍ॅप नाही आहे. मात्र टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर धक्कादायक आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना या अ‍ॅपपासून दूर राहण्यासही सांगितले आहे. त्यांनी असं का सांगितलं ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावेल दुरोव्ह यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या फोनमधील कोणत्याही गोष्टीवर अ‍ॅक्सेस मिळवण्यास सक्षम आहेत. तसेच, त्यांनी युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, “मी लोकांनी टेलिग्राम वापरावे असं म्हणत नाही. तुम्ही कोणतेही मेसेजिंग अ‍ॅप वापरा, मात्र व्हॉट्सअ‍ॅपपासून दूर राहा.”

टेलिग्राममधील एका पोस्टमध्ये पावेल दुरोव्ह यांनी म्हटलंय की व्हॉट्सअ‍ॅपने गेल्याच आठवड्यात सुरक्षेची समस्या उघड केली आहे. ते असेही म्हणाले की व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ एक द्वेषयुक्त व्हिडिओ पाठवून किंवा तुमच्यासह व्हिडिओ कॉल सुरू करून हॅकर्स तुमच्या फोनवर नियंत्रण मिळवू शकतात. २०१६ पूर्वी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एन्क्रिप्शन नव्हते. यापूर्वीही २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० साली अशा अनेक सुरक्षा समस्या उघडकीस आल्या होत्या.

विश्लेषण : मोबाईलच्या IMEI क्रमांकाची सरकारकडे नोंदणी करणे का आहे आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये पावेल दुरोव्ह यांनी अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर टीका केली आहे. त्यांनी २०१९ मध्येही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना चेतावणी दिली होती. त्यांनी युजर्सना आपल्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करण्यास सांगितले होते. यामुळे युजर्सचे फोटो आणि मेसेज लीक होण्यापासून प्रतिबंध करता येईल असे त्यांचे म्हणणे होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay away from whatsapp find out why the founder of telegram pavel durov gave this advice pvp