काही काळापूर्वी मेटाने इन्स्टाग्रामवर ‘थ्रेडस’ [Threads] नावाचे एक नवे फीचर लाँच केले होते. तेव्हा अनेक वापरकर्त्यांनी हा नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी अगदी उत्सुकतेने थ्रेडसवर अकाउंट उघडले होते. मात्र, आता हे अकाउंट डिलीट करणे म्हणजे थ्रेड्स वापरकर्त्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. कारण- एखाद्या व्यक्तीला जर त्याचे थ्रेड्स अकाउंट डिलीट करायचे असेल, तर त्याबरोबर वापरकर्त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील डिलीट होते, असे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, त्रासामुळे सर्व थ्रेड्स वापरकर्ते चांगलेच नाराज झाले होते. त्यांची नाराजी कंपनीच्याही लक्षात आली. त्यामुळे सर्वांच्या या समस्येवर अखेरीस कंपनीने तोडगा काढला आहे. आता इन्स्टाग्राम हॅण्डल डिलीट न होऊ देता वापरकर्ते त्यांचे थ्रेड्सचे अकाउंट बंद वा डिलीट करू शकतात. तुम्हालासुद्धा तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट न करता, थ्रेड्स प्रोफाइल डिलीट करायचे असल्यास खाली दिलेल्या स्टेप्सचे पालन करा.

हेही वाचा : Smartphone ते टीव्ही कोणतेही उपकरण मिनिटांमध्ये चार्ज करेल ‘ही’ पॉवर बँक! किंमत पाहा

थ्रेड्स अकाउंट डिलीट कसे करावे?

तुमच्या थ्रेड्स अकाउंटवर जावे.
थ्रेड्स प्रोफाइलमधील सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला ‘डिलीट’ असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
केवळ या तीन स्टेप्सचा वापर करून, तुम्ही तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद न करता, केवळ थ्रेड्स अकाउंट डिलीट करू शकता.

तुम्हाला जर हे अकाउंट कायमचे बंद करायचे नसल्यास, थ्रेड्स अकाउंट तात्पुरते डिसेबलदेखील करता येऊ शकते. ते कसे करू शकतो हेदेखील पाहा.

हेही वाचा : आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा

पहिले स्क्रीनवर खाली कोपऱ्यात दिसणाऱ्या तुमच्या अकाउंट / प्रोफाइलवर क्लिक करा.
नंतर सेटिंग या पर्यायावर क्लिक करा.
स्क्रीन वर डिअॅक्टिव्हेट युअर अकाउंट किंवा डिलीट युअर अकाउंट, असा पर्याय दिसेल.
स्क्रीनवर दिसणाऱ्या या पर्यायांपैकी तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडावा.
निवडलेला पर्याय कन्फर्म करून घ्या. तुमचे थ्रेड्स अकाउंट डिअॅक्टिव्हेट होईल.

मात्र, एक लक्षात ठेवा की, थ्रेड्स प्रोफाइल हे आठवड्यातून केवळ एकदाच डिअॅक्टिव्हेट करता येऊ शकते. त्यामुळे वापरकर्त्याने विचार करून प्रोफाइल डिअॅक्टिव्हेट करावे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Step by step guide on how to delete threads profile without deleting instagram account check out dha