Voter ID link with Aadhaar card: राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम १ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे.

गेल्या वर्षी लोकसभेत केंद्र सरकारने निवडणूक कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेले विधेयक मंजूर झाले आहे. यानंतर मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यासाठी मतदारांना सक्ती केली जाणार नाही, ते त्यांच्या आवडीने आधार आणि मतदार कार्ड लिंक करू शकतील.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आता Gmail चं स्टोरेज होणार नाही फुल, नको असलेले मेल आपोआप होणार डिलीट; जाणून घ्या जबरदस्त Trick

या मोहिमेअंतर्गत, निवडणूक आयोगाने अनेक राज्यांमध्ये शिबिरे आयोजित केली आहेत, जिथे लोकांना मतदारांशी आधार लिंक करण्यासाठी मदत केली जाईल. याशिवाय लोक आधार आणि मतदार ओळखपत्र ऑनलाइनही लिंक करू शकतात. याबाबतची संपूर्ण माहिती नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल- nvsp.in वर उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रक्रियेसाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.

  • सर्वप्रथम nvsp.in ला भेट द्या आणि नोंदणी पूर्ण करा.
  • आता पोर्टलच्या होम पेजवर मतदार यादीवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र तपशील प्रविष्ट करा.
  • आता फीड आधार क्रमांक उजव्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यात तपशील आणि एपिक (EPIC) क्रमांक प्रविष्ट करा.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक केल्यावर स्क्रीनवर एक नोटिफिकेशन दिसेल.

जीमेलवर चुकून सेंड झाला मेल? चिंता करू नका; ‘या’ टिप्सने करता येणार अनसेंड

एसएमएसद्वारे आधार कार्डला मतदार ओळखपत्र लिंक कसे करावे?

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया एसएमएसद्वारेही पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी १६६ किंवा ५१९६९ वर ECILINK< SPACE> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवावा लागेल. ECILINK नंतर, तुमचा EPIC क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

याशिवाय फोन कॉलद्वारे आधार आणि मतदार आयडी लिंक करता येईल. तुम्ही सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत १९५० या क्रमांकावर कॉल करून लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकता.

ऑफलाइन प्रक्रियेत बूथ लेव्हल ऑफिसरकडे अर्ज करून मतदार त्यांचे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करू शकतात. त्यासाठी अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवावा लागेल.

Story img Loader