Using Smartphone in Toilet?: मोबाईल हा माणासाच्या आयुष्यातील अतिमहत्वाचा भाग बनला आहे. अर्थात ‘आपला मोबाईल म्हणजे जिव की प्राण’ अशी काहीशी परिस्थिती दिसून येते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत स्मार्टफोन वापरतात. कधी कामासाठी तर कधी टाईमपास करण्यासाठी सर्व लोक स्मार्टफोनचा सर्रास वापर करतात. हाच टाईमपास आता चक्क टॉयलेटमध्येही जाऊन पोहोचलाय. अनेकांना टॉयलेट शिटवर खूप वेळपर्यत बसून काहीतरी सर्च करण्यात मज्जा वाटतेय. मात्र, ही चूकीची सवय आपल्या आरोग्यासाठी भयंकर घातक ठरू शकते. अश्या दुष्परिणामांचा खुलासा एका रिपोर्टद्ववारे केला आहे.
काय म्हणतो NordVPN चा रिपोर्ट ?
NordVPN या रिपोर्टनुसार, १० पैकी ६ लोक त्यांचा व्यवसाय करत असताना, विशेषतः तरुण लोक त्यांचा फोन वॉशरूममध्ये घेऊन जातात. या अभ्यासातील ६१.६ % सहभागींनी सांगितले की, ते टॉयलेट सीटवर बसून त्यांचे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया खाते तपासतात. अभ्यासानुसार, जवळजवळ एक तृतीयांश (३३.९%) लोक बाथरूममध्ये चालू घडामोडी वाचतात तर एक चतुर्थांश (२४.५%) त्यांच्या प्रियजनांना संदेश पाठवतात. लोकही टॉयलेट सीटवरच आयुष्याशी संबंधित प्रत्येक समस्या आणि त्यावर उपाय चर्चा करतात. खरं तर, एका अभ्यासात असे म्हटले आहे की, आपल्या स्मार्टफोनमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १० पट जास्त बॅक्टेरिया आढळतात, ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
(हे ही वाचा: SmartPhones News: ‘हे’ आहेत बेस्ट बॅटरी लाईफ असणारे Android स्मार्टफोन्स, संपूर्ण यादी एकदा पहाच)
स्मार्टफोन टॉयलेट किंवा बाथरूममध्ये वापरणे धोकादायक
टॉयलेट किंवा बाथरूम ही घरातली अशी जागा आहे, जिथे खराब बॅक्टेरिआचा सतत वापर असतो. बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे हे खूप महत्वाचे आहे. परंतु जर तुम्ही तिथे फोन घेऊन गेलात आणि तो सॅनिटाइज न करता वापरला तर त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. यामुळे केवळ आरोग्यच धोक्यात येत नाही तर आपल्या त्वचेलाही इन्फेक्शन होऊ शकते. त्याचबरोबर इतरही आजारांना बळी पडू शकतो.
टॉयलेटमध्ये स्मार्टफोनचा अधिक वापर मूळव्याधीला आमंत्रण
तुम्हाला माहीत आहे का? टॉयलेटमध्ये फोन वापरल्यास पाईल्स म्हणजेच मूळव्याध होण्याचा धोका असतो. लोक टॉयलेटमध्ये बराच वेळ फोन वापरतात आणि ते तिथे इतका वेळ घालवतात की, काही वेळेस त्यांचे पाय सुन्न होतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, यामुळे गुदाशयावर दबाव येतो. ही चूक सतत करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
टॉयलेटमध्ये स्मार्टफोनचा अधिक वापर डायरियाचा होईल त्रास
टॉयलेटमध्ये फोन वापरल्यानेही डायरियाही होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही आरोग्याची एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये संबधित व्यक्तीला उलट्या आणि जुलाब होतात. डायरिया होण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब बॅक्टेरिआ. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने फोनच्या स्क्रीनद्वारे हा बॅक्टेरिआ आपल्या शरीरात पोहोचतो व त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणूनच स्मार्टफोनचा वापर कुठं, किती आणि कसा करायचा हे तुम्हाला ठरवायं आहे. काळजी घ्या, स्वस्थ रहा मस्त राहा.