काही काळापासून भारतामध्ये विवो व्हाय२००ई ५जी (VIVO Y200e 5G) भारतात लाँच होणार असल्याची नुसती चर्चा सुरू होती. मात्र, आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून, विवो Y200e 5G भारतात या महिन्यात लाँच होणार आहे. अर्थातच यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. काय आहे या स्मार्टफोन्सच्या किमती आणि खासियत पाहा.
विवो Y200e 5G भारतात २२ फेब्रुवारी रोजी लॉंच होणार आहे. कंपनीने एक्स (ट्विटर)वर पोस्ट शेअर करीत ग्राहकांसाठी स्मार्टफोनचे डिझाईन आणि रंग पर्याय सांगितले आहेत. या स्मार्टफोनचे ऑक्टोबर २०२३ मध्ये अनावरण करण्यात आले होते; जो आता फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात येईल.
गॅजेट ३६० यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात विवो Y200e 5G ची किंमत २० हजार रुपये इतकी असणार आहे. या मॉडेलमधील स्मार्टफोनसाठी निळा आणि नारंगी अशा दोन रंगाचे पर्याय मिळणार आहेत. या पोस्टमध्ये स्मार्टफोनचा केशरी रंग पर्याय पॅनेलवर व्हेगन लेदर फिनिश आणि स्टिचसारख्या क्रिस-क्रॉस पॅटर्नसह; तर निळा रंग पर्याय टेक्स्चर फिनिशसह दिसतो आहे. पण, त्यात फॉक्स लेदरऐवजी प्लास्टिकचा बॅक ग्राहकांना दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन ६ जीबी व ८ जीबी रॅम पर्यायांसह लाँच होईल. तसेच कंपनीने सांगितले आहे की, रॅम १६ जीबीपर्यंत वाढवला देखील जाऊ शकतो.
हेही वाचा…Honor चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन भारतात लाँच; १०८MP कॅमेरा अन् ग्राहकांसाठी खास ऑफर्स, पाहा किंमत…
पोस्ट नक्की बघा :
Vivo Y200e 5G स्मार्टफोनमध्ये १२०एचझेड रिफ्रेश रेट आणि १२०० नीट्सच्या पीक ब्राइटनेससह ६.६७ इंच फुल-एचडी प्लस + सॅमसंग एमोलेड डिस्प्ले असणार आहे. तसेच स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 4 Gen 2 SoC द्वारे समर्थित आणि ॲण्ड्रॉइड १३ किंवा ॲण्ड्रॉइड १४ -आधारित यूआयसह पाठविण्याची अपेक्षा कंपनीने वर्तवली आहे. ४४ डब्ल्यू वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी विवोच्या या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी पॅक असणार आहे.
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि पाच मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर स्मार्टफोनच्या मागील बाजूस असणार आहे. तर फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेल सेन्सरचा असणार आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि धूळ व स्प्लॅश Resistanceसाठी आयपी५४ रेटिंगसह दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचे वजन सुमारे १८५.५ ग्रॅम आणि त्याची जाडी सुमारे ७.७९ मिमी असणार आहे. या जबरदस्त फीचर्ससह विवोचा हा स्मार्टफोन लवकरच ग्राहकांसाठी लाँच करण्यात येईल.