OTT Platforms: गेल्या दोन-तीन वर्षांत भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण सिनेमागृहात न जाण्यापेक्षा घरीच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरीज पाहतात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ओटीटीचा प्रेक्षक वर्ग वाढला आहे. मात्र, ओटीटीवर सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला महिन्याभराचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. जे प्रत्येकाला शक्य नसते. पण आता आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहोत. ज्यावर तुम्ही चित्रपट, सीरिजचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

9 OTT प्लॅटफॉर्मचे मिळणार सबस्क्रिप्शन

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, डिझनी प्लस हॉटस्टार, सोनी लिव सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक वेब सिरीज रिलीज होत असतात. पण या वेब सिरीज पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. आणि सबस्क्रिप्शन साठी बक्कळ पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अनेकजण सबस्क्रिप्शन घेणे टाळतात. वेगवेगळ्या दूरसंचार सेवा प्रदात्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनसह OTT अॅप्सच्या सबस्क्रिप्शन ऑफर देऊ केल्या आहेत. बीएसएनएलचाही असाच प्लॅन आहे. कंपनीने OTT सबस्क्रिप्शनसह एक अतिशय खास प्लॅन ऑफर आणली होती. या प्लॅनमध्ये यूजर्सना 9 OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजे तुम्हाला मनोरंजनाचा पुरेपूर आनंद मिळेल.

(हे ही वाचा : भन्नाट! दोन महिने मिळणार फ्री इंटरनेट; ‘या’ कंपनीने ग्राहकांसाठी आणली अनोखी ऑफर )

किती खर्च करावे लागणार पैसे

बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी तुम्हाला फक्त २४९ रुपये खर्च करावे लागतील. ही ऑफर सामान्य प्लॅनसह उपलब्ध नाही, परंतु ही ऑफर ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅनसह उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला या प्लॅनचा फक्त ब्रॉडबँडवर आनंद घेता येणार आहे.

माहितीनुसार, २४९ रुपयांमध्ये, कंपनीला ZEE5, SonyLIV, Voot Select, Yupp TV, aHa, Lionsgate Play, Hungama, Disney + Hotstar आणि आणखी एक OTT वर प्रवेश मिळतो. या प्लॅनचा फायदा फक्त त्या वापरकर्त्यांना मिळेल जे कंपनीच्या एंट्री लेव्हल ब्रॉडबँड प्लॅनचा वापर करतात.

या रिचार्जसाठी कंपनीने Yupp TV Scope सोबत भागीदारी केली आहे. तुम्ही हे अॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करू शकता. या प्लॅटफॉर्मचा फायदा असा आहे की तुम्ही एकाच लॉगिनवर एकाधिक प्लॅटफॉर्मवरील सामग्रीमध्ये प्रवेश करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subscription of 9 ott apps will be available with only 249 recharge plans of bsnl watch unlimited movies and webseries pdb