पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नी-प्राइम’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. बुधवारी संध्याकाळी ही चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.क्षेपणास्त्राने त्याच्या कामगिरीची पडताळणी करून सर्व चाचणी उद्दिष्टे साध्य केल्याचे म्हटले आहे. ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी)बरोबर ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजी अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-प्राइम या क्षेपणास्त्राची चाचणी केली,’ असे मंत्रालयाने सांगितले.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, एसएफसी प्रमुख आणि डीआरडीओ आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाचणीची पाहणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ, एसएफसी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे सशस्त्र दलांची ताकद आणखी मजबूत होईल, असे ते म्हणाले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल चौहान आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही कामत यांनी यशस्वी चाचणीसाठी एसएफसी आणि डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतुक केले.