सध्याच्या काळात प्रत्येकाचा गुगल आणि जीमेलशी संबंध येतोच. शिवाय तुम्ही जर अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला Gmail बाबत नव्याने काही सांगण्याची गरज नाही. कारण तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तो सुरु करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जीमेलमध्ये लॉगिन करावं लागतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाय मोबाईलमध्ये गुगलकडून पुरवल्या जाणाऱ्या यूट्यूब, गुगल मॅप आणि गुगल मीट यांसारख्या इतर अ‍ॅप्सना अॅक्टिवेट करण्यासाठी देखील तुम्हाला Gmail खातं काढणं गरजेचं असतं. किंवा काही जणांचं पहिल्यापासून जीमेलवर खातं असेल तर त्यांना फक्त त्या अ‍ॅपला सुरु करण्यासाठी तात्पुरता अॅक्सेस द्यावा लागतो. पण आपण मोबाईलमधील वेगवेगळ्या अॅप्सना मेलचा अक्सेस देतो तेव्हापासून आपल्या जीमेलवर अनेक ईमेल यायला सुरुवात होते.

आणखा वाचा- भारीचं! आता WhatsApp घेऊन आलाय तगडा फीचर, एका क्लिकमध्ये पाठवू शकता ‘इतक्या’ लोकांना मेसेज

शिवाय तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल आणि तुम्हाला कंपनीकडून महत्वाचे ईमेल येत असतील, तर तुम्हाला नव्याने आणि सतत येणाऱ्या बिनकामाच्या मेलचा त्रास होतो आणि त्यामुळे महत्त्वाचे ईमेल बघणं देखील राहून जातं. शिवाय या नको असलेल्या मेलमुळे तुमच्या Gmail चे स्टोरेज देखील फुल होते.

तुम्हाला जर सतत येणाऱ्या मेल्सचा कंटाळा आला असेल तर त्यापासून सुटका कराण्यासाठीच्या आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही नको असलेले ईमेल काही क्षणात ब्लॉक करू शकणार आहात. शिवाय एकदा ब्लॉक केलेला Gmail तुम्ही पुन्हा अनब्लॉक देखील करु शकता. तर चला जाणून घेऊया या ब्लॉक-अनब्लॉकची प्रक्रिया.

हेही वाचा- …म्हणून चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरतात, जाणून घ्या त्यामागचं खरं कारण

असे कराल नको असलेले Gmail ब्लॉक –

  • मोबाईल किंवा लॅपटॉवर Gmail उघडा.
  • तुम्हाला ब्लॉक करायचा असलेला ईमेल ओपन करा.
  • तुम्हाला वरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ३ डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.
  • ‘ब्लॉक’ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि कन्फर्म करा.
  • तुम्ही कन्फर्म करताच तो ईमेल ब्लॉक होईल.

अनब्लॉक करण्यासाठी –

  • सर्वात आधी तुम्हाला Google सेटिंगमध्ये जावं लागेल.
  • त्यानंतर ‘मॅनेज युअर गुगल अकाउंट’ या पर्यायावर क्लिक करा.
  • People & shareing हा पर्याय निवडा.
  • People & shareing पर्याय निवडला की त्याखाली कॉन्टॅक्ट आणि टॅप ब्लॉक असा पर्याय दिसेल.
  • ब्लॉक केलेल्या Google खात्यांची लिस्ट दिसेल.
  • तुम्हाला जो मेल अनब्लॉक करायचा आहे त्यावर क्लिक करा.