Sundar Pichai talks about what Google looks for in aspirants : भारतात दरवर्षी हजारो तरुण इंजिनिअरिंगची पदवी घेतात, त्यामुळे मोठ्या कंपनीत नोकरी मिळावी असे प्रत्येक इंजिनिअरचे स्वप्न असते. कोणत्याही स्पर्धात्मक टेक कंपनीपेक्षा, गूगलमध्ये नोकरी करण्याची त्या प्रत्येक इंजिनिअरची इच्छा असतेच. पण, एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तयारी, उत्तम अर्ज प्रक्रिया आवश्यक आहे. येथे इंटर्नशिप किंवा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला अनेक सुविधाही दिल्या जातात; तर गूगलची मूळ कंपनी Alphabet चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी त्यांच्या कंपनीत त्यांना कसा इंजिनिअर हवा आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगितलं आहे.

“द डेव्हिड रुबेन्स्टाईन शो : पीअर टू पीअर कॉन्व्हर्सेशन्स”वर माहिती देताना सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी सर्च इंजिन, दिग्गज कंपनी गूगलच्या १,७९,००० कामगारांमध्ये सामील होण्यासाठी काय करावे लागते याबद्दल सांगताना ते म्हणाले की, गूगलमध्ये काम करण्यासाठी केवळ टेक्निकली कौशल्य पुरेसे नसून कंपनीत इतर कर्मचाऱ्यांबरोबर शिकण्यासाठी, बदलत्या परिस्थितीत जुळवून घेण्यासही उत्सुक असले पाहिजे. कारण गूगलला “सुपरस्टार सॉफ्टवेअर इंजिनियर्स” हवे आहेत, जे गतिशील वातावरणात चांगले काम करू शकतात. याव्यतिरिक्त गूगलमध्ये फक्त नोकरी नाही तर गूगल कर्मचाऱ्यांना मोफत जेवण दिले जाते, तेही विविध पर्यायांसह. यामागे उद्देश म्हणजे एक समुदाय निर्माण करणे आणि सर्जनशीलतेला चालना देणे आहे; असे सुंदर पिचाई म्हणाले आहेत.

important tips to filling upsc personality test application form
मुलाखतीच्या मुलखात : छंदांची माहिती भरतानाचे तारतम्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा…Jio Recharge Plans : सतत वेब सीरिज पाहताय, तर कधी स्विगीवरून फूड ऑर्डर करताय? मग हे रिचार्ज प्लॅन ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

त्याचप्रमाणे पिचाई यांनी कंपनीतील त्यांच्या सुरुवातीच्या काळातील क्षणांची आठवण करून दिली. गूगलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ऑफिसच्या कॅफेत झालेल्या अनपेक्षित भेटींमुळे नवीन कल्पना विकसित झाल्या आहेत, त्यामुळे कंपनीत सहकाऱ्यांचे सहकार्य किती महत्त्वाचे आहे हे सुंदर पिचाई यांनी हायलाइट केले आणि यामुळे कर्मचारी एकमेकांशी संवाद साधून नव्या कल्पना आणखीन उदयास आणू शकतात असेसुद्धा सांगितले.

गूगलमध्ये काम करण्याची इतकी जास्त मागणी का आहे?

गूगलमध्ये ज्यांना जॉब ऑफर केली जाते त्यापैकी ९० टक्के कर्मचारी जॉब ऑफर स्वीकारतात, कारण गूगलवर नोकरी मिळणे ही एक मोठी अचिव्हमेंट आहे, विशेषत: टेक इंडस्ट्रीमध्ये. कारण सध्या अनेक कंपन्यांना टाळे मारण्यात आले आहे आणि नोकरीच्या संधीदेखील कमी उपलब्ध आहेत.

Story img Loader