Swiggy Deliver Food In Fifteen Minutes : पावसाळा, उन्हाळा असो किंवा हिवाळा, झोमॅटो, ऑनलाइन फूड डिलिव्हर करणाऱ्या विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय अगदी वेळेत आपल्यापर्यंत अन्न किंवा वस्तू पोहचवतात. झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट आदी अनेक कंपन्यांमध्ये दररोज स्पर्धा सुरू असते. कोणाच्या वस्तूंची क्वॉलिटी (गुणवत्ता) चांगली, तर कोणी विविध ऑफर्स ग्राहकांना देतो, तर कोणी अगदी कमी वेळेत अन्न तुमच्यापर्यंत पोहचवतो. तर आता या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी स्विगी (Swiggy) मार्केटमध्ये उतरला आहे.

बंगळुरूस्थित फूड डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’ (Swiggy), स्नॅक्स, शीतपेये आणि जेवण फक्त १० ते १५ मिनिटांत पोहचवण्यासाठी स्वतंत्र, नवीन ॲप घेऊन आला आहे. या ॲपचे नाव ‘स्नॅक’ (Snacc) असे आहे. सध्या ही सेवा केवळ निवडक बंगळुरू परिसरात उपलब्ध आहे. Snacc शहरी ग्राहकांना त्यांच्या जेवणाच्या अनुभवांमध्ये आणखीन चांगल्या सुविधा आणि वेग देण्याच्या शोधात आहे.

tips to help you fix Wifi problem
WiFi Speed : वायफायचा स्पीड स्लो झालाय? मग असे मिळवा फास्ट इंटरनेट; ‘या’ टिप्स वाढवतील WiFi बरोबर कामाचाही वेग
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Spotify logo
Spotify : “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, ‘Work From Anywhere’ वर स्पॉटिफाय ठाम

ॲपच्या मेनूमध्ये नाश्ताचे पदार्थ (breakfast items), हलके जेवण (light meals) विविध पेये यांचा समावेश असेल आणि ज्यांना त्वरीत नाश्त्याची आवश्यकता आहे त्यांची मदत करेल. ग्राहक Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर Snacc ॲप डाउनलोड करू शकतात. आतापर्यंत स्विगीच्या सर्व नवीन कल्पना आणि ॲडिशन्स मुख्य स्विगी ॲपपुरत्या मर्यादित आहेत, जे आता अधिकाधिक गोंधळलेले आणि वापरण्यास कठीणसुद्धा वाटत आहेत. त्यामुळेच की काय अल्ट्रा-फास्ट फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगीची (Swiggy) एंट्री होते आहे.

हेही वाचा…WiFi Speed : वायफायचा स्पीड स्लो झालाय? मग असे मिळवा फास्ट इंटरनेट; ‘या’ टिप्स वाढवतील WiFi बरोबर कामाचाही वेग

१५ मिनिटांत डिलिव्हरी देण्याची हमी (Swiggy)

Snacc ॲप लाँच बोल्टसह स्विगीच्या यशावर आधारित आहे, त्याची अल्ट्रा-फास्ट फूड डिलिव्हरी आर्म १५ मिनिटांच्या आतमध्ये डिलिव्हरी देण्याची हमी देते आणि कमीत कमी टाइमलाइनमध्ये इतर हॉटेल्सबरोबर ऑर्डर पूर्ण करण्यास सक्षम करते. बोल्टच्या विपरीत, Snacc विविध प्रकारच्या रेडी-टू-सर्व्ह उत्पादने आणखी जलद आणि अधिक विश्वासार्ह सेवा सक्षम करते.

या ॲप लाँचमुळे स्विगी, झेप्टो कॅफे आणि ब्लिंकिट बिस्ट्रो यांच्याशी थेट स्पर्धा करणार आहे. या दोघांनीही जलद अन्न वितरण बाजारपेठेत आधीच प्रगती केली आहे. भारताच्या अल्ट्रा-फास्ट फूड डिलिव्हरी सेगमेंट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अन्न वितरण कंपन्या सतत नवनवीन शोध घेत आहेत. अनेकांनी डिलिव्हरीचा वेळ कमी करण्यासाठी हायपरलोकल डिलिव्हरी मॉडेल्सचा अवलंब केला आहे. असे असले तरीही हाय ऑपरेशनल कॉस्ट आणि डिलिव्हरी टाइमलाइन पूर्ण करताना अन्न गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी दबाव या कंपन्यांसाठी मुख्य अडथळे ठरत आहेत.

Snacc सादर करून या स्पर्धात्मक बाजारपेठेत एक स्थान निर्माण करण्यासाठी स्विगी त्याच्या लॉजिस्टिक नेटवर्क आणि तांत्रिक कौशल्यावर बँकिंग करत आहे. उद्योग तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, अशा उपक्रमांमुळे शहरी भारतातील अन्न वापराच्या पद्धती पुन्हा परिभाषित केल्या जाऊ शकतात आणि अल्ट्रा-फास्ट फूड डिलिव्हरी सेगमेंटच्या वाढीला गती देऊ शकतात.

Story img Loader