टाटा स्कायने आपला ब्रँड पुन्हा लाँच केला असून आतापासून टाटा प्ले नावाने ओळखला जाईल. ग्राहकांना टाटा प्ले पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीचा लाभ मिळेल. वास्तविक टाटा प्लेच्या माध्यमातून आता कंपनी १३ ओटीटी सेवा जोडणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिस्ने + हॉटस्टारची सुविधा देखील मिळेल. कंपनीने यासाठी ३९९ रुपयांचा कॉम्बो पॅक लॉन्च केला आहे. ग्राहक २७ जानेवारीपासून त्यांच्या टाटा प्ले खात्यात जोडू शकतात. टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हरित नागपाल यांनी सांगितले की, “आम्हाला माहिती आहे की बरेच लोक अजूनही टेलिव्हिजन पाहत असताना ओटीटी पाहतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पाहत आहेत. नवीन ब्रँड ओळख या कल्पनेशी सुसंगत आहे. आम्ही आता फक्त डीटीएच प्लेयर नाही तर लाइव्ह टेलिव्हिजन आणि ओटीटी सेवांवर सामग्री देखील वितरीत करतो.” नागपाल म्हणाले की, जेव्हा एकाच कुटुंबातील सदस्य टीव्ही पाहत नाहीत, तेव्हा हा कॉम्बो पॅक त्यांना त्यांच्या आवडीचा मजकूर मोबाइल फोन किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची परवानगी देईल. प्लॅनच्या किमती स्क्रीनच्या संख्येनुसार, DTH कनेक्शन आणि सदस्यता घेतलेल्या पॅकनुसार बदलतील.
२७ जानेवारीपासून, टाटा स्कायच्या टाटा प्लेमध्ये रुपांतरित केल्यापासून १७५ रुपयांचे सर्व्हिस विजिट चार्ज माफ केले जाईल. यासोबतच ज्या डीटीएच ग्राहकांनी बराच काळ आपला पॅक रिचार्ज केला नाही. ते देखील विनामूल्य पुन्हा कनेक्शन मिळवू शकतात. कंपनीने टाटा प्लेच्या प्रमोशनसाठी करीना कपूर खान, सैफ अली खान, आर माधवन आणि प्रियामणी या कलाकारांना सामील केले आहे.
Vivo T1 फोन स्नॅपड्रॅगन ६९५ एसओसीसह लवकरच भारतात लॉन्च होणार!, जाणून घ्या
टाटा सन्स आणि रुपर्ड मर्डॉकची कंपनी 21st Century Fox यांच्यातील ८०:२० भागीदारीत टाटा स्काय लाँच करण्यात आले होते. यानंतर 21st Century Fox आणि टाटा ग्रुपने टीएस इन्व्हेस्टमेंट्सची स्थापना केली. टाटा स्काय मधील २० टक्के हिस्सा विकत घेतला. त्यानंतर फॉक्सला ९.८ टक्के अतिरिक्त अप्रत्यक्ष हिस्सा मिळाला. जेव्हा रुपार्ड मर्डोकने फॉक्सचा मनोरंजन व्यवसाय वॉल्ट डिस्ने कंपनीला विकला. तेव्हा टाटा स्कायचा स्टेक देखील वॉल्ट डिस्ने कंपनीकडे हस्तांतरित झाला. टाटा स्काय डीटीएच सेवेला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. कंपनी देशातील दोनशेहून अधिक शहरांमध्ये आपली सेवा देत आहे. तिचे १९ दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. जे टाटा स्कायच्या माध्यमातून डीटीएच आणि फायबर-टू-होम ब्रॉडबँड सेवेद्वारे जोडले गेले आहेत.