टाटा स्कायने आपला ब्रँड पुन्हा लाँच केला असून आतापासून टाटा प्ले नावाने ओळखला जाईल. ग्राहकांना टाटा प्ले पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीचा लाभ मिळेल. वास्तविक टाटा प्लेच्या माध्यमातून आता कंपनी १३ ओटीटी सेवा जोडणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि डिस्ने + हॉटस्टारची सुविधा देखील मिळेल. कंपनीने यासाठी ३९९ रुपयांचा कॉम्बो पॅक लॉन्च केला आहे. ग्राहक २७ जानेवारीपासून त्यांच्या टाटा प्ले खात्यात जोडू शकतात. टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हरित नागपाल यांनी सांगितले की, “आम्हाला माहिती आहे की बरेच लोक अजूनही टेलिव्हिजन पाहत असताना ओटीटी पाहतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पाहत आहेत. नवीन ब्रँड ओळख या कल्पनेशी सुसंगत आहे. आम्ही आता फक्त डीटीएच प्लेयर नाही तर लाइव्ह टेलिव्हिजन आणि ओटीटी सेवांवर सामग्री देखील वितरीत करतो.” नागपाल म्हणाले की, जेव्हा एकाच कुटुंबातील सदस्य टीव्ही पाहत नाहीत, तेव्हा हा कॉम्बो पॅक त्यांना त्यांच्या आवडीचा मजकूर मोबाइल फोन किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची परवानगी देईल. प्लॅनच्या किमती स्क्रीनच्या संख्येनुसार, DTH कनेक्शन आणि सदस्यता घेतलेल्या पॅकनुसार बदलतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा