TCL आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करणार आहे. TCL ने दोन डिव्हाइस सादर केली आहेत. एक डिव्हाइस प्रोटोटाइप असून त्याची स्क्रीन आत आणि बाहेर करता येऊ शकते. दुसरे उपकरण फोल्ड करण्यायोग्य आहे. या स्मार्टफोनला सध्या अल्ट्रा फ्लेक्स असे नाव देण्यात आले आहे. हे ३६०-डिग्री रोटेटिंग हिंज वापरून आत किंवा बाहेर दुमडले जाऊ शकते.

टेक तज्ञांच्या मते, TCL च्या फोल्डेबल फोनमध्ये २,४६०×१,८६० रिझोल्यूशनसह ८-इंचाचा PLP AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले किंवा हिंज कसे काम करेल याबद्दल TCL ने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी

दोन्ही बाजूने फोल्डिंग होणारे फोन

TCL यांचे म्हणणे आहे की, ड्युअल फोल्डेबल डिस्प्ले असण्याचे फायदे आहेत. आतील बाजूने दुमडल्यास, ते Samsung Galaxy Z Fold मालिकेप्रमाणेच कार्य करेल, तर Huawei Mate X प्रमाणे बाहेरील बाजूस दुमडल्यावर ते कॅमेर्‍याचे व्ह्यूफाइंडर म्हणून काम करू शकते.

दोन्ही डिव्हाइस सध्या फक्त संकल्पना आहेत. हे अद्याप उत्पादन श्रेणीत आलेले नाहीत. त्यानंतर TCL ने सांगितले की हे अल्ट्रा फ्लेक्स प्रथमच प्रदर्शित केले जाणार आहे, तर फोल्ड एन’ रोल यापूर्वी केवळ चीनमध्येच प्रदर्शित करण्यात आले होते.

अल्ट्रा फ्लेक्स आणि फोल्ड एन रोल

३६०-डिग्री अल्ट्रा फ्लेक्स हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेला Samsung Galaxy Z Fold 3 आणि Microsoft Surface Duo 2 सारखे आहे. पण TCL चा फोन हा विरुद्ध दिशेलाही फिरवला जाऊ शकतो. कव्हर डिस्प्ले नसल्यामुळे फोनची बॅक-फोल्डिंग क्षमता एका हाताने तुमहाल हे डिव्हाइस वापरता येईल.

अल्ट्रा फ्लेक्स या फोनची डिझाइन संकल्पना Galaxy Z Fold 3 आणि Surface Duo 2 मधील अधिक संकरित करते. मायक्रोसॉफ्टच्या फोल्डेबलमध्ये मध्यभागी दोन स्क्रीन एकत्र जोडलेल्या आहेत, तर, TCL च्या प्रोटोटाइपमध्ये एक मोठी स्क्रीन आहे जी आतील बाजूस फोल्ड करते. पण Surface Duo 2 प्रमाणे, हा TCL फोन एकाधिक मोड वापरण्यासाठी परत फोल्ड केला जाऊ शकतो. अल्ट्रा फ्लेक्स सॅमसंगच्या फोल्डेबलमध्ये अर्ध्या भागात फोल्ड होणारी स्क्रीन आहे. पण Samsung चा Galaxy Z Fold 3 TCL च्या अल्ट्रा फ्लेक्स प्रोटोटाइप आणि Surface Duo 2 प्रमाणे वेगळ्या प्रकारे फोल्ड होत नाही.

TCL चे अल्ट्रा फ्लेक्स २,४६०×१,८६० रिझोल्यूशनसह ८-इंच AMOLED स्क्रीन दाखवते. हे वैशिष्ट्य Galaxy Z Fold 3 च्या 7.6-इंच स्क्रीनपेक्षा मोठे असणार आहे. मात्र TCL कंपनीने अद्याप डिव्हाइसच्या प्रोसेसर किंवा कॅमेरा रिझोल्यूशनबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Tcl करेल स्पर्धा

TCL स्मार्ट टीव्हीच्या जगात प्रसिद्ध आहे. पण हे स्मार्टफोन अजूनही बाजारात सध्या नवीन आहे. परंतु फोल्ड करण्यायोग्य उपकरणांमधील त्याची गुंतवणूक हे सूचित करते की ते पुढील वर्षांसाठी मोबाइल उद्योगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोनशी स्पर्धा करू शकेल.

TCL प्रत्यक्षात फोल्डेबल फोनची विक्री कधी सुरू करणार हा प्रश्न आहे. आणि जर TCL ने फोल्डेबल फोन लाँच केला, तर तो कमी म्हणजे ५० ते ५५ हजार रुपयांना विकण्याचा त्यांचा मानस आहे. टीसीएलने या रेंजमध्ये फोल्डेबल फोन आणल्यास बाजारात स्पर्धा खूपच तीव्र होईल. कारण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फोल्डेबल फोनची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Story img Loader