देशातील नावाजलेली आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे माजी सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या एकूण कमाईत आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३.१७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांनी यावर्षी २९.१६ कोटी रुपये कमावले आहे. कंपनीने या संदर्भात अहवाल सादर केला आहे.
गोपीनाथन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सर्वाधिक पगार असणारे IT क्षेत्रातील पाचव्या क्रमांकाचे सीईओ होते. या वर्षाची त्यांची बेसिक सॅलरी १.७ कोटी रुपये होती. कंपनीने सांगितल्याप्रमाणे गोपीनाथन हे 16 सप्टेंबर २०२३ पर्यंत टाटा कंपनीत सल्लागार (an advisory ) या पदावर राहणार आहेत.
हेही वाचा : रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात ५ वर्षांत ४० टक्के वाढ; ‘इतके’ टन सोने केले खरेदी
के क्रितिवासन नवे सीईओ
या महिन्याच्या सुरुवातीलाच के कृतिवासन यांनी TCS चे नवे
सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. ५८ वर्षीय कृतिवासन हे आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना TCS कंपनीचा ३० पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे. यापूर्वी क्रितिवासन BFSI ( Banking, Financial Services and Insurance) चे अध्यक्ष आणि ग्लोबल हेड होते.
आयटी कंपनी सर्व्हिसच्या मते, नवे सीईओ कृतिवासन यांचा मासिक पगार १६ लाख आहे तर बेसिक सॅलरी १० लाख आहे.
कृतिवासन मागील ३४ वर्षांपेक्षा जास्त ग्लोबल टेक्नोलॉजी क्षेत्रात कार्यरत राहिले आहे. १९८९ मध्ये ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये आले. TCS मध्ये इतक्या वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सेल्स, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिलिव्हरी फिल्डमध्ये काम केले.
हेही वाचा : एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले, तुमचा EMI आता वाढणार
राजेश गोपीनाथन
TCS चे माजी सीईओ राजेश गोपीनाथन हे गेल्या २२ वर्षापासून कंपनीशी जुळून आहे. सीईओ पदावर असताना त्यांनी अनेक चांगली कामे केली. मागील सहा वर्षांमध्ये गोपीनाथन यांनी एमडी आणि सीईओ म्हणून कौतुकास्पद असे कंपनीचे नेतृत्व सांभाळले. TCS ला समोर नेण्यासाठी गोपीनाथन यांचे मोलाचे योगदान आहे.
टाटाचे माजी सीईओ एन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये राजेश गोपीनाथन यांची CEO पदावर नियूक्ती करण्यात आली. पुढे मार्च 2022 मध्ये, गोपीनाथन यांची पुन्हा 2027 पर्यंत म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला.