सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र TCS या दिग्गज कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता दिसत नाही आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा कोणताही हेतू नाही.
TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, TCS कंपनी स्टार्टअप कंपन्यांमधून नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे. तसेच पुढे बोलताना लक्कड म्हणाले, माझे हे विधान अशा वेळी आले आहे की, जगभरातील दिग्गज टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.
हेही वाचा : Google Layoffs: गुगलने ४५३ भारतीयांना कामावरून काढलं, सुंदर पिचाई म्हणाले…
तसेच ते पुढे म्हणाले की, कर्मचारी कपात करण्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही त्यांच्यातील स्किल्सला प्राधान्य देतो. अनेक कंपन्यांनी आपल्या गरजेपेक्षा जास्त लोकांना काम दिल्याने त्यांना कर्मचारी कपातीचे पाऊल उचलावे लागत आहे. जेव्हा एखादी कर्मचारी TCS कंपनीमध्ये काम करण्यासाठी येतो तेव्हा त्याला यशस्वी बनविण्याची जबाबदारी ही कंपनीची असते.
अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की कर्मचाऱ्यांकडे असेलली कार्यक्षमता आम्हाला असलेल्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. या स्थितीमध्ये आम्ही कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून त्याला वेळ देतो असे मिलिंद लक्कड यांनी सांगितले. टीसीएसच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ही सहा लाखांपेक्षा अधिक आहे. लक्कड यांनी सांगितले, कंपनी कर्मचाऱ्यांना मागील वर्षाप्रमाणे वेतनवाढ देण्यात येणार आहे.
TCS त्यांच्या स्टॉक ऑप्शन्स स्कीमचे पुनरावलोकन करेल का असे विचारले असता, लक्कड म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचे मूल्यांकन करत आहोत कारण निष्ठा आणि कामगिरी हे दोन्हीची भूमिका महत्वाची असते. स्टार्टअप असा ऑफर्सच्या आधारावर अनेक लोकांना आकर्षित करतात.TCS कंपनीचे काम सध्या जगातील ११५ देशांमध्ये सुरु आहे. त्यांची जगभरात ४० पेक्षा जास्त रिसर्च सेंटर्स आहेत. या कंपनीमध्ये सुमारे ६ लाख कर्मचारी आहेत . यामध्ये ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. तसेच TCS कंपनी १५ प्रकारच्या ओद्योगिक क्षेत्रात काम करत आहे.