Ebay Layoff: सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. ई-कॉमर्स कंपनी Ebay सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ४ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.
इबे कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ४ टक्के म्हणजेच ५०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. CNBC मधील एका बातमीनुसार इबे कंपनीचे सीईओ जेमी इयानोन यांनी कर्मचाऱ्यांसह एक मेमो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. सीईओ जेमी इयानोन म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून जागतिक आर्थिक मंदीमुळे व त्याचे परिणाम याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : Tech Layoffs: Zoom कंपनी करणार १३०० कर्मचाऱ्यांची कपात; सीईओंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे इबे कंपनीच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता येईल असेही सीईओ इयानोन यांनी नमूद केले. नवीन नोकऱ्यांच्या कपातीमुळे कंपनीला तिला सर्वात जास्त चांगले परिणाम मिळवून देतील अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होणार आहे. नोकर कपातीच्या घोषणेनंतर आफ्टर मार्केट ट्रेडमध्ये अमेरिका आधारित ई-टेलरच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे सीईओ जेमी इयानोन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक मेसेज लिहिला आहे. ज्यात ते म्हणतात की, हा बदल आम्हाला उच्च संभाव्य क्षेत्रांमध्ये गुतंवणूक करण्याच्या दृष्टीने आणि नवीन भूमिका घेण्यासाठी अतिरिक्त जागा मिळणार आहे.