सध्या जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. Amazon ने आपल्या दुसरी फेरीतील कपात देखील केली आहे.  आता ग्रोसरी डिलिव्हरी करणारी कंपनी Dunzo बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या कंपनीमधील अनेक कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार आहे. कारण कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांनी कपात करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील बंगळुरू स्थित स्टार्टअप कंपनी Dunzo पुन्हा एकदा आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने चालणारी ही कंपनी आपल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार किराणा वितरित करणारी Dunzo कंपनी आपल्या ३०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

हेही वाचा : Amazon layoffs: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची होणार कपात, कारण…

रिपोर्टनुसार Dunzo कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कबीर बिस्वास यांनी ५ टाऊनहॉल येथे ५ एप्रिल रोजी झालेल्या बॅबिटकीत कर्मचाऱ्यांना कपातीच्या नवीन फेरीबद्दल माहिती दिली. तथापि, डंझोने अद्याप टाळेबंदीच्या नवीन फेरीबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने दिल्ली-एनसीआरसह आसपासच्या अनेक भागात आपले काही डार्क स्टोअर्स बंद केले होते. या डार्क स्टोअर्स टीममधून कंपनीने २५ ते ३५ टक्के कर्मचारी काढून टाकले होते. कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी आणि हंगामी अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जानेवारी माहिन्यात देखील केली होती कपात

या वर्षी जानेवारीमध्ये, डंझोने आपल्या टीमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीम रचना आणि नेटवर्क डिझाइनवर लक्ष केंद्रित केल्यामुळे खर्चात कपात करण्याच्या नावाखाली ३ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली होती. Dunzo कंपनी सध्या देशामध्ये दिल्ली, मुंबई व बंगळुरू, पुणे, गुरुग्राम, हैद्राबाद आणि चेन्नईमध्ये आपली सेवा देते.