Clear Cache Guide : अँड्रॉइड मोबाइलमधील कॅशे फाइल क्लिअर केल्याने मोबाइल हँग होण्याचं प्रमाण कमी होतं, स्टोरेज स्पेस फ्री होऊ शकते आणि विविध अॅप्स वापरताना येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. त्यामुळे मोबाइलमधील कॅशे फाइल क्लिअर करण्यासाठी तुम्ही खालील काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिव्हिज्युअल अ‍ॅप कॅशे कसा क्लिअर करायचा?

मोबाइलमधील स्पेस फ्री करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येक अॅप टेम्पररी डेटा स्टोर करून ठेवतो, जेणेकरून लोडिंग टाइम स्पीड अप होईल, त्यालाच कॅशे असे म्हणतात. प्रत्येक अॅप स्टोर करत असलेला कॅशे करप्ट होऊ शकतो, ज्यामुळे मोबाइल नीट काम करेनासा होता, त्यामुळे कॅशे क्लिअर करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

१) सेटिंग्जमध्ये जा : तुमच्या अॅप ड्रॉवर किंवा होम स्क्रीनवर ‘सेटिंग्ज’ आयकॉन शोधा आणि त्यावर क्लिक करा.

२) अ‍ॅप्स नेव्हिगेट करा : खाली स्क्रोल करा आणि ‘अ‍ॅप्स’ किंवा ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ सेक्शन शोधा.

३) एक अ‍ॅप सिलेक्ट करा : तुम्हाला इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅप्सची एक लिस्ट दिसेल. तुम्हाला ज्या अ‍ॅपचा कॅशे क्लिअर करायचा आहे त्यावर टॅप करा.

४) स्टोरेज वर जा : अॅपच्या माहितीमध्ये ‘स्टोरेज’ किंवा ‘स्टोरेज अँड कॅशे’ ऑप्शन शोधा आणि त्यावर टॅप करा.

५) कॅशे क्लिअर करा: यात तुम्हाला दोन बटणं दिसतील, एक म्हणजे ‘स्टोरेज क्लिअर’ आणि दुसरं ‘कॅशे क्लिअर’. यातील ‘कॅशे क्लिअर बटणावर टॅप करा. सेव्ह केलेल्या सेटिंग्ज आणि लॉगिन माहितीसह सर्व अॅप डेटा हटवायचा नसेल तर ‘क्लियर स्टोरेज’ वर टॅप करू नका.

अशाप्रकारे तुम्ही प्रत्येक अॅप्सचा कॅशे याचप्रकारे क्लिअर करू शकता.

स्टोरेज कमी करण्यासाठी वापरा ही दुसरी ट्रिक

१) सर्वप्रथम मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.

२) यानंतर ‘स्टोरेज’ ऑप्शनवर क्लिक करा.

३) आता फाइल कॅटगरीमधील लिस्टवर जा आणि किती स्पेश आहे तपासा

४) आता ‘फ्री अप स्पेप’ ऑप्शनवर क्लिक करा.

५) या ठिकाणी तुम्हाला Google Files app अथवा Remove Items पर्याय निवडा लागेल.

६) यात तुम्हाला फोटो अथवा व्हिडिओ डिलीट करण्याचा पर्याय मिळतो, जो बॅकअपसाठी घेतला जातो.

७) यातून तुम्ही उपयोगी नसलेल्या फाइल्स अथवा अप्सला देखील डिलीट करू शकता.