सध्या अनेक टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे.गुगलसारख्या दिग्गज कंपनीनेदेखील नुकतेच तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही कपात म्हणजे वाईट वेळेपासून वाचण्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले. तेव्हापासून सोशल मीडियावर नोकरीवरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची सांख्य वाढली आहे. अनेक जण मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांना काढून टाकल्यामुळे त्यांच्या आठवणी सांगत आहेत.

कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक कर्मचारी जिचे नाव निकोल त्साई आहे. ज्या दिवशी कामावरून कमी करण्यात आले त्या दिवशी काय घडले हे स्पष्ट करण्यासाठी YouTube व्हिडीओ केला होता. ९१ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. या व्हडिओमध्ये तिला बॉसने केलेला ईमेल आठवतो. यामध्ये तिला कळले की अधिकृत ईमेल आयडी तिच्यासाठी उपलब्ध नसणार आहे.

हेही वाचा : Google ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; दंड भरण्याचे दिले आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

व्हिडिओमध्ये त्साई आपले अश्रू पुसत म्हणाली की , कंपनीच्या ऑफिशियल ईमेल आयडी आणि कॅलेंडरमध्ये प्रवेश करू न शकल्यामुळे मी माझ्या बॉसला फोन केला. जेव्हा त्साने आपल्या बॉसला हे सांगितले तेव्हा बॉसच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आले कारण त्साईला नोकरीवरून काढल्याचे बॉसला त्साईकडूनच कळले होते.

हेही वाचा : FLIPKART वर स्वस्त दरात मिळतोय GOOGLE चा ‘हा’ फोन

इतक्या लोकांना कमी करणे हा सर्वाना मोठा धक्का होता. मात्र तिने काहीतरी चांगले करण्यासाठी Disneyland जाण्याचा निर्णय घेतला. गुगल असो किंवा मायक्रोस्फोट अशा अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी नोकर कपातीचे पाऊल उचलले आहे.

Story img Loader