सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft , Meta आणि Google सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळा आपल्या कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. Google च्या टाळेबंदीमुळे जगभरातील सुमारे १२,००० कमर्चारी प्रभावित झाले होते. यातीलच एका गुगल इंडियाच्या कर्मचाऱ्याने लिंकडेनवर आपली व्यथा सांगितली आहे.
आकृती वालिया असे त्या महिला कमर्चाऱ्याचे नाव आहे जी गुगलच्या टाळेबंदीमुळे प्रभावित झाली होती आणि तिला तिची नोकरी गमवावी लागली होती. आकृती वालिया या महिला कमर्चाऱ्याने सांगितले की, मिटींगच्या आधी दहा मिनिटे तिच्या कॉम्प्युटरवर Access Denied असा मेसेज आल्याने तिला मोठा धक्का बसला होता.
आकृती वालिया यांनी याबद्दल सुरुवातीला नकार दिला होता. तथापि त्यांनी दावा केला की, शेवटी तिने आपली नोकरी गेल्याच्या या बातम्यांशी जुळवून घेतले आहे. google मध्ये तिचे नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे तिने सांगितले. व्यक्तिगत आणि व्यावसायिक या दोन्ही गोष्टींमध्ये विकसित होण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी कंपनीचे कौतुक केले आहे. तसेच तिच्या नोकरीच्या काळामध्ये त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे आभार मानले.
तसेच आकृती वालिया यांनी आपली नोकरी गेल्यामुळे सहा वर्षांच्या मुलीला काय सांगायचे याबद्दल होणार त्रास देखील मान्य केला आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, मी आता यापुढील माझ्या भविष्याबद्दल योजना आकाशात आहे. माझ्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे, कारण मला कळत नाही आहे की मी माझ्या ६ वर्षांच्या मुलीला कसे समजावू की तिची आई काम करत नाही आहे किंवा कामावर जात नाही आहे.
गेल्या वर्षीच्या अखेरीस Google ने त्याच्या कामांच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. यामुळे कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा पहिला संकेत दिला असे म्हणायला हरकत नाही. जानेवारी महिन्यात गुगलने १२,००० कर्मचाऱ्याने कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.. तथापि काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाच्या नवीन पोस्टमध्ये हे सांगण्यात आले आहे की, कर्मचारी कपात पूर्णपणे कामगिरीच्या आधारावर झालेली नाही आहे.