सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज कंपन्या अनेक कारणांमुळे आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये Salesforce कंपनीने देखील आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जानेवारी महिन्यामध्ये जाहीर करण्यात आला. याचा परिणाम सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांवर झाला. त्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी याबद्दल आपली बाजू सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मात्र कंपनीने केलेली कपात एकाचवेळी करण्यात आल्याचे दिसून येत नाही. कारण कपात जाहीर झाल्यानंतर चार महिन्यानंतर अनेक कमर्चाऱ्यांना त्यांची नोकरी गेल्याचे कळले आहे. यामधील एक कर्मचारी निकोल चॅन जो सेल्सफोर्स कंपनीच्या सिंगापूर ऑफिसमधून काम करत होता. त्याने आपली नोकरी गेल्याबद्दल एक लिंकडेन पोस्ट शेअर केली आहे.याबाबतचे वृत्त इंडिया टूडे ने दिले आहे.

woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
swiggy employee stock option scheme
स्विगीचे ५०० कर्मचारी कोट्याधीश
Trump picks Susie Wiles as his chief of staff
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘चीफ ऑफ स्टाफ’पदी महिला ऑफिसरची नियुक्ती; कोण आहेत सूसी विल्स? या पदाचे महत्त्व काय?
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका

हेही वाचा : Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमधील नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्याने शेअर केली भावूक पोस्ट; म्हणाला, “पहिलीच नोकरी…”

निकोल चॅन या सेल्सफोर्स कंपनीतून नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्याने आपली व्यथा सोशल मीडियावर शेअर केली आहे. लिंकडेनवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चॅन म्हणाल्या , ”तुमची नोकरी गेली आहे असा ईमेल मला मिळाल्यावर मला सुरुवातीला धक्काच बसला होता. त्या मेलमध्ये माझी नोकरी गेल्याचे सांगण्यात आले होते. पण मला हा ईमेल चुकून पाठवण्यात आला आहे असे वाटले होते.”तसेच पुढे त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, तिचा या कंपनीतील २ वर्षांचा प्रवास अचानक थांबला होता. कारण तिला APAC Product Success department मधून तिच्यासह तिच्या सहकार्यांना नोकरीवरून काढण्यात आले होते.

बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असे समोर आले की, दोन अज्ञात सूत्रांची सांगितले, सेल्सफोर्स कंपनी गुंतवणूकदारांच्या दबावाचा परिणाम म्हणून व्यवस्थपनातील काही स्तरावर कर्मचारी कपात करण्याची आहे. तसेच सेल्सफोर्सचे सीओओ ब्रायन मिलहॅम यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या फेरीतील नवीन कपातीच्या फेरीचे संकेत दिले होते. कंपनीच्या संरचनेत काही बदल करण्याची गरज भासल्यास कंपनी आवश्यक ती सर्व पावले उचलू शकते असे त्यांनी सांगितले.