संपूर्ण जगभरामध्ये सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गक टेक कंपन्या काही विविध क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचारीकाची कपात करत आहेत. अनेक कंपन्यांनी तर चार वेळा, दोन वेळा सुद्धा कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. एका भारतीय कंपनीने या ताळेबंदीच्या वातावरणामध्ये अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये १,००० कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
PTI च्या वृत्तानुसार HCLTech कंपनी रोमानिया देशामध्ये आपला विस्तार करणार आहे. HCLTech कंपनी गेल्या पाच वर्षांपासून रोमानियामध्ये कार्यरत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी देशामध्ये आधीपासूनच सुमारे १,००० लोकांना रोजगार देत आहे. तसेच आता कंपनी स्थानिकांना टेक्नॉलॉजीमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी अधिक संधी निर्माण व्हाव्यात यासाठी Bucharest आणि Iasi आपल्या ऑफिसचा विस्तार करणार आहे. याबाबतचे
आम्ही रोमानियामधील स्थानिकांना टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये करिअर करता यावे यासाठी आम्ही गुंतवणूक करत आहोत असे HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू म्हणाले.
HCLTech ने आपला विस्तार करण्यासाठी रोमानियामध्ये अधिक लोकांना कामावर नियुक्त करण्याचे उचललेले पाऊल देशासाठी आणि एकूणच IT उद्योगासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. कंपनीने घेतला हा निर्णय या देशामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदतशीर ठरणार आहे.
अनेक कंपन्यांनी केली कर्मचाऱ्यांची कपात
Google, Amazon आणि Meta या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जानेवारीमध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मेटा आणि Amazon कंपन्यांनी दोन वेळा कपात केली. त्यामध्ये अनुक्रमे त्यांनी २१,००० आणि २७,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.