Tech Layoffs: सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft , Meta आणि Google सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळा आपल्या कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे. कंपनीचे CEO, मार्क झुकेरबर्ग यांनी हे देखील मान्य केले की टेक दिग्गज कंपनीने महामारीच्या काळात लोकांना ‘ओव्हरहायर’ केले आणि आता कठीण आर्थिक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा : युजर्ससाठी WhatsApp लवकरच लॉन्च करणार ‘Channels’ नावाचे फिचर; मिळणार ‘हे’ फायदे

मेटाने कर्मचाऱ्यांची कपात केल्यापासून अनेक कर्मचारी त्यांचे अनुभव किंवा व्यथा सांगण्यासाठी पुढे आले आहेत. सोशलण मिडियावर ते आपले म्हणणे मांडत आहेत. त्यातील एक कर्मचारी म्हणजे चेल स्टेरिओफ. चेल स्टेरिओफ या महिला कर्मचारी २०२१ पासून मेटा कंपनीमध्ये काम करत होत्या.

LinkedIn वर आपला अनुभव सांगताना स्टेरिऑफ म्हणाल्या, ”मेटामध्ये मी २ वर्षांपासून काम करत होते. २ वर्षानंतर अचानक पहाटे ४.०६ मिनिटांनी मला ईमेल प्राप्त झाला. त्यामध्ये मेटा लेऑफमुळे माझ्या नोकरीवर परिणाम झाल्याचे त्या इमेलमधून सूचित करण्यात आले. म्हणजे हा माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल असे त्या इमेलमध्ये सांगण्यात आले होते. ”

तसेच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, मला मिळालेल्या सर्व संधींबद्दल मी मेटाचे आभार मानते. मी माझ्या कार्यकाळामध्ये खूप काही शिकले. त्याआधी मी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये दीड वर्षे काम केले आहे. मी ज्यांच्यासह काम केले त्या कंपनीची मूल्ये मी जगले आहे. मी ज्यांच्यासह काम केले ते सर्व सहकारी यांचे आभार मानते. आता त्यांच्यासोबत काम करता येणार नाही.

हेही वाचा : Tech Layoffs: Meta मधून नोकरी गेलयावर कर्मचाऱ्याने लिंकडेनवर मांडली व्यथा; म्हणाला, “जो पर्यंत…”

मेटाने केलेल्या नवीन कर्मचारी कपातीच्या फेरीचा फटका UX डिझायनर्स, इंजिनिअर्स आणि टेक्निकल टीमवर झाला आहे. मार्चमध्ये मेटाने टाळेबंदीच्या दुसर्‍या फेरीची घोषणा केली जिथे त्यांनी हे देखील उघड केले की नोकरकपात ही तीन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यातील १०,००० जणांची कपात हा पहिला टप्पा असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech meta employee recevied layoff email at 4 am last day at work share post at link linkedin tmb 01
Show comments