आपण सगळेच स्मार्टफोन्सचा वापर करतो आणि त्यासाठी स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड असणे अत्यंत गरजेचे असते. या सिम कार्डच्या मदतीने तुम्हाला तुमच्या हक्काचा फोन नंबर मिळतो. तसेच सिम कार्डच्या मदतीने तुम्ही मोबाइलमध्ये विविध कंपन्यांचे रिचार्ज करून, मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याबरोबर गप्पा मारू शकता; तसेच सोशल मीडियाचा पुरेपूर आनंद लुटू शकता.

भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने सिम कार्डांची विक्रीही अनेक पटींनी वाढली आहे. आज बहुतेक वापरकर्त्यांकडे दोनपेक्षा जास्त सिम कार्डे आहेत आणि त्यामुळे सिम कार्डाशी संबंधित घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तर तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे तपासायचे असेल, तर भारत सरकारच्या ‘संचार साथी पोर्टल’मध्ये एक टूल आहे; जे तुम्हाला तुमचा नंबर ‘आधार’शी लिंक केलेल्या सिम कार्डची संख्या तपासून देते.

Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Special campaign for caste certificate verification.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम…
Senior citizen duped by cyber fraudster in pune
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’; बतावणी करुन  ३८ लाखांची फसवणूक
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क
E mulakat facility for communication with family in Buldhana Jail
कारागृहात ई-मुलाखतीची सुविधा! कैद्याना कुटुंबाशी साधता येईल संवाद
apple siri users private voice recorded
Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड भरणार; तक्रारदारांना मिळणार प्रत्येकी ‘इतकी’ रक्कम?

हेही वाचा…आता WhatsApp वर सहज शोधले जाणार जुने मेसेज; युजर्ससाठी लाँच होणार ‘कॅलेंडर फीचर’

तुमच्या नावावर किती सिम कार्डे आहेत हे कसे शोधून काढाल?

१. सगळ्यात आधी तुमच्या आवडीचे कोणतेही इंटरनेट ब्राउजर ओपन करा आणि सर्च बारमध्ये ‘Tafcop portal’ टाईप करून सर्च करा. किंवा तुम्ही ‘संचार साथी’ पोर्टलवर जाऊनही हा पर्याय शोधू शकता.

२. त्यानंतर तिथे तुम्हाला मोबाइल नंबर किंवा captcha टाईप करण्यास सांगितले जाईल.

३. एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की, व्हॅलिडेट captcha वर क्लिक करा. मग तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी एंटर करा आणि लॉग इन बटनावर टॅप करा.

नंतर स्क्रीनवर तुमच्या नावावर ॲक्टिव्ह किंवा रजिस्टर असलेले नंबर दिसतील. त्यातील एखादा नंबर तुम्हाला संशयास्पद आढळला, तर तुम्ही डावीकडील बॉक्सवर क्लिक करून त्याची तक्रार नोंदवू शकता. ‘नॉट माय नंबर’ हा पर्याय निवडा आणि खालील ‘रिपोर्ट’ बटणावर क्लिक करण्यासाठी पुढे जा. असे केल्याने हा नंबर तुमचा नाही हे दूरसंचार विभागाला सूचित केले जाईल. त्यानंतर सरकार त्या विशिष्ट क्रमांकाची सेवा बंद करू शकते. तसेच यादीतील एखाद्या नंबरची तुम्हाला ‘आवश्यकता नसेल’ तर Not Required हा पर्याय निवडा. तसेच तुम्ही ‘आवश्यक’ म्हणजेच (Requird) पर्यायदेखील निवडू शकता आणि ‘रिपोर्ट’ (Report) बटण दाबून सरकारला सांगू शकता की, तुम्ही हा मोबाइल नंबर वापरत आहात.

या वर्षाच्या सुरुवातीला १.८ लाखाहून अधिक सिम कार्डे ब्लॉक करण्यात आली आहेत. जे कथितपणे बनावट किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख वापरून खरेदी केले गेले होते. ज्यात ५०० सिम कार्डे आहेत; जी एकाच फोटोवर विविध नावे आणि पत्त्यांवर जारी केली गेली होती. तपास एजन्सींनी एका प्रकरणाचा शोध लावला; ज्यात डीलरने कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय ६७ हजार सिम कार्डे विकली. भारतामध्ये बनावट ओळखीखाली नोंदणी केलेल्या सिम कार्डाच्या आसपासच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या समस्येवर कारवाई करण्यासाठी, दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कनेक्शनची मोठ्या प्रमाणात विक्री बंद केली आणि सांगितले की, डीलर्सना सिमची विक्री सुरू ठेवायची असल्यास त्यांनी एका वर्षाच्या आत टेलिकॉम ऑपरेटरकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, संचार साथी पोर्टल सुरू झाल्यापासून, भारत सरकारने बनावट कागदपत्रांचा वापर करून रजिस्टर केलेले ५२ लाख मोबाइल क्रमांक तपासले आहेत.

Story img Loader