OpenAI द्वारे ChatGPT चॅटबॉट नोंव्हेंबर २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा एक कृत्रिम AI आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसांसारखे बोलणारे तंत्रज्ञान तुम्ही देखील वापरून पाहिले असेल. मात्र त्याचा वापर करून झाल्यावर ते अकाउंट तुम्हाला नको आहे. त्याचा वापर तुम्ही करू इच्छित नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामध्ये आज आपण चॅटजीपीटीचे अकाउंट कसे डिलीट करायचे याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : ChatGpt Plus: चॅटबॉट वापरासाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे, जाणून घ्या

इतर कोणत्याही सोशल मीडिया अ‍ॅपप्रमाणेच, ChatGPT अकाउंट मॅनेज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. OpenAI च्या वतीने, वापरकर्त्यांना ChatGPT अकाउंट डिलीट करणे, निष्क्रिय करण्याचा पर्याय मिळतो. तथापि, एकदा अकाउंट डिलीट झाले की तो सर्व डेटा तुम्ही गमावला असल्याचे मानले जाते. तुम्हाला अकाउंटशी संबंधित कोणताही डेटा भविष्यात शोधता येणार नाही.

अशा प्रकारे करता येणार ChatGPT चे अकाउंट डिलीट

१. ChatGPT अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हा सर्वात पहिल्यांदा वेबसाईटवर लॉगइन करणे आवश्यक आहे.
२. त्यानंतर उजव्या बाजूला टॉप कॉर्नरवर असलेल्या Help बटणावर क्लिक करावे लागेल.
३. त्यानंतर ‘send us a message वरती क्लिक करा.
४. अकाउंट डिलीट करण्यासाठी सिस्टीममधून तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल.
५. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल.
६. त्याशिवाय वापरकर्त्याला deletion@openai.com. वर सुद्धा क्लिक करू शकतात.
७. अकाउंट डिलीट झाल्यावर कंपनी वापरकर्त्याला एक कन्फर्मेशन पाठवते.
८. सर्वात महत्वाचे म्हणजे अकाउंट डिलीट होण्यासाठी ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

हेही वाचा : ChatGpt वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कात्री, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या

नवीन टेक स्टार्टअप OpenAI ने ChatGPT Plus ची घोषणा केली आहे. AI चॅटबॉट चॅटजीपीटीसाठी पेड सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे. या नवीन सब्स्क्रिप्शन प्लॅनमुळे वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली आणि वेगवान सेवा मिळेल. AI चॅटबॉट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच लॉन्च करण्यात आला होता आणि तेव्हापासून त्याची सतत चर्चा सुरु आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tech news how to delete openai chatgpt chatbot account and data tmb 01
Show comments