आधार कार्ड बनवताना आपल्याला आपली बायोमॅट्रिक माहिती रजिस्टर करावी लागते. या आपल्या हाताची बोटे आणि डोळय़ांचा रेटिना स्कॅन केला जातो. हे बायोमॅट्रिक आपली संपूर्ण ओळख ठेवण्याच्या कामी येते. तसेच, हे आपल्या ओळखीच्या संदर्भातील कामांमध्ये भरपूर उपयोगी पडते. परंतु, आपल्या या बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे बायोमेट्रिक माहितीचा गैरवापर करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधारच्या माध्यमातून नोंदवण्यात येणारी ही माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेची आहे. याकरिता आधार पोर्टलवर तुम्हाला सुविधा देण्यात आली आहे. ‘एम-आधार’च्या साह्याने तुम्ही तुमच्या आधार नोंदणीवरील बायोमेट्रिक ‘लॉक’ अर्थात कुलूपबंद करून ठेवू शकता. यामुळे तुमची बायोमेट्रिक माहिती सुरक्षित राहते. अनेकांना आधारवरील हे तपशील ‘लॉक’ कसे करायचे, याची माहिती असते. मात्र, ते खुले कसे करायचे याबद्दल मागाहून संभ्रम होतो. म्हणूनच ‘एम आधार’च्या मदतीने बायोमेट्रिक कसे ‘अनलॉक’ करायचे, हे जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा