Private Photo Leak: मोबाईल फोनमध्ये असलेले खासगी फोटो आणि व्हिडीओ लीक होण्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फोन वापरताना सावधान राहिलं पाहिजे. तुम्ही केलेली एक चूक महागात पडू शकते. कारण तुमचं खासगी आयुष्य इंटरनेटवर लीक होऊ शकतं. मोबाईल मध्ये सुरक्षित विकप्ल असतानाही व्हिडीओ-फोटो लीक होऊ शकतात. यामागे अनेक कारणं असू शकतात. तुमच्या मोबाईलमधील खासगी फोटो आणि व्हिडीओ लीक होण्यापासून तुम्हाला कशाप्रकारे बचाव करता येईल, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती
जर तुम्ही खासगी फोटो दुसऱ्या व्यक्तीला मोबाईलवर पाठवला असेल आणि त्या वक्तीनं तो फोटो अन्य युजरला ट्रान्सफर केला, तर तुमचा फोटो लीक होण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य कोणालाही तुमच्या मोबाईलचा अॅक्सेस मिळाला, तर ती व्यक्तीही तुमचा खासगी डेटा ट्रान्सफर करुन लीक करु शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईलला लॉक करुन ठेवणं अधिक चांगलं असतं. याव्यतिरिक्त तुम्ही कुणालाही तुमचा खासगी फोटो सेंड करु नका. पण इतर कारणांमुळेही फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ शकतात. यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाचा अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे.
थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सपासून सावध राहा
थर्ड पार्टी मॅलेशियस अॅप्सद्वारेही फोटो-व्हिडीओ लीक होतात. मॅलेशियस व्हायरस असणाऱ्या अप्लिकेशन तुमच्या अडचणी वाढवतात. या अॅप्सला तुमच्या डेटाचाही अॅक्सेस मिळतो. या फाईल्सला रिमोट सर्वरवर अपलोड केलं जातं. त्यानंतर स्कॅमर्स या फाईल्सला थर्ड पार्टीला विकतात आणि तुमच्या फोनमधील खासगी डेटा लीक होतो. यासाठी तुम्ही अधिकृत अॅप स्टोरमधूनच दुसऱ्या अॅप्लिकेशन्सला इन्स्टॉल करा. अॅप इन्स्टॉल करण्याआधी त्यामध्ये असलेल्या रिव्यूची तपासणी करा. थर्ड पार्टी अॅप स्टोर किंवा वेबसाईट्सवरून इन्स्टॉल केलेल्या अॅपमध्ये व्हायरस असू शकतं. सोशल इंजीनियरिंगच्या माध्यमातूनही हॅकर्स तुम्हाला टार्गेट करु शकतात. याद्वारे हॅकर्सला युजरचा अकाउंट आणि पासवर्ड मिळतो.
क्लाऊड ड्राईव्हमधूनही डेटा लीक होऊ शकतो
याचा वापर क्लाऊडमधील गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्सवरील स्टोर फोटोज किंवा डॉक्यूमेंट्सला अॅक्सेस करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कधीही फिशिंग वेबसाईट्सवर तुमची माहिती भरू नका. सोशल मीडियावरून आणि व्हाट्सअॅपवरून येणाऱ्या काही लिंकपासून सावध राहा. हॅकर्स स्पायवेयरच्या माध्यमातूनही तुम्हाला टार्गेट करु शकतात. स्पायवेयर तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा अॅक्सेस करु शकतो. यामध्ये फोटो आणि व्हिडीओचा समावेश आहे. याशिवाय हॅकर्स तुम्हाला ब्लॅकमेल करुन डेटा लीक करु शकतात.