Tecno एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने आपली आणखी एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे. कंपनीने आपली Tecno Camon 20, Camon 20 Pro आणि Camon 20 Pro 5G हे तीन फोन या सिरीज अंतर्गत लॉन्च केली आहे. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Tecno Camon 20 सिरीजमधील स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा ब्राईटनेस हा ५०० नीट्स इतका असू शकतो. फोनमध्ये इनबिल्ट फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP53 इतके रेटिंग देण्यात आले आहे. तीनही स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.

iPhone SE 4 launch Tomorrow
iPhone SE4 : २० तासांच्या बॅटरी लाईफसह स्वस्तात मस्त iPhone येतोय बाजारात! असतील ‘हे’ जबरदस्त फीचर्स
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
marathi comedian pranit more says The main accused is still absconding
Video: “मुख्य आरोपी अजूनही फरार”, मारहाण प्रकरणानंतर प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ आला समोर, म्हणाला, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये…”
Vivo V50 is launching in India on February 17
Vivo V50 : 6,000mAh बॅटरीसह लाँच होणार विवोचा स्लिम, ड्रीम स्मार्टफोन; कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल? जाणून घ्या
Google Pixel 9a Feature And Launch Date
Google Pixel 9a खरेदी करणाऱ्यांना ‘या’ ॲपचे मिळणार फ्री सब्स्क्रिप्शन; कधी होणार लाँच? घ्या जाणून…
Treatment options for Smartphone vision syndrome
Smartphone vision syndrome: तुम्हीही मोबाईलवर सतत स्क्रोल करत असता का? मग होऊ शकतो स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम; वाचा लक्षणे आणि उपाय
मायदेशी परतलेल्या स्थलांतरितांची चौकशी; अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरच्या विमानतळावर दाखल
Two thousand CCTV cameras off in Nagpur
नागपुरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद, पालकमंत्र्यांनी हे दिले निर्देश

हेही वाचा : ChatGPT अ‍ॅप आयफोनवर कसे वापरायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

फोटोग्राफीसाठी पहिल्या आणि मधल्या व्हेरिएंटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ६४+२+२ मेगापिक्सलचे कॅमेरा मिळतात. टॉप व्हेरिएंटमध्ये ५०+१०८+२ मेगापिक्सलचे कॅमेरे मिळतात. तीनही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत

Techno Camon 20 हा स्मार्टफोन कंपनीने ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत १४,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्ही Black , blue आणि Glacier Glow या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. Camon 20 Pro 5G हा फोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ८/१२८ जीबी आणि/२५६ जीबी स्टोरेज येते. बेस मॉडेलची किंमत १९,९९९ रुपये तर टॉप मॉडेलची किंमत २१,९९९ रुपये आहे. हे फोन तुम्ही Serenity Blue आणि Dark Welkin या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. Tecno Camon 5G Premier या फोनच्या किंमतीबद्दल कंपनीने खुलासा केलेला नाही आहे.

Story img Loader