Tecno Phantom X2 Pro 5G India Launch : टेक्नो कंपनीने आपलं नवीन स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Tecno Phantom X2 Pro 5G से आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या फोनचे K Daura हे मॉडेल लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत आणि फीचर्स बद्दल आपण माहिती घेऊयात.
काय आहेत फीचर्स ?
Tecno Phantom X2 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा ६.८ इंचाचा फुल एचडी एमओएलईडी प्रकारचा डिस्प्ले आहे. यामध्ये गोरिला ग्लास येते. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजची क्षमता यामध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 हा प्रोसेसर येतो. तसेच याच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास या फोनचा कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा येतो जॅमध्ये OIS चा प्रायमरी सपोर्ट असतो. १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि तिसरा कॅमेरा हा ऑप्टिकल झूम व पोर्ट्रेट लेनचा कॅमेरा सेटअप यात येतो.
काय असेल किंमत ?
हा स्मार्टफोन मुनलाइट सिल्व्हर , स्टारडस्ट ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन Amazon India वर देखील उपलब्ध आहे. या फोनची किंमत ही ४९,९९९ रुपये इतकी असणार आहे. या फोनची परी ऑर्डर ग्राहक करू शकतात. येस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ईएमआय व्यवहारांवर १५०० रुपयांची सूट मिळत आहे. तसेच HSBC कार्ड धारकांसाठी २५० रुपयांची सूट मिळत आहे.