Tecno Pova 4 : डिसेंबर महिन्यात रेडमी, रिएल मी सहित सॅसंगचे स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. त्यामुळे, या महिन्यात तुम्ही फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. अधिक रॅम आणि जास्त क्षमतेची बॅटरी असणारा फोन हवा असल्यास Tecno Pova 4 हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये कोणते फीचर्स मिळणार आहेत? याबाबत जाणून घेऊया.
ई कॉमर्स संकेतस्थ अमेझॉनवरवर Tecno Pova 4 हा फोन कमिंगसून टॅगसह दिसून येत आहे. या स्मार्टफोनसाठी संकतेस्थळावर वेगळी माइक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. एका नवीन अहवालानुसार टेक्नो पोवा ४ डिसेंबर महिन्यात लाँच होऊ शकतो.
(‘APPLE’साठी हे वर्ष ठरले जबरदस्त! 2023 मध्ये लाँच करू शकते ‘ही’ भन्नाट उपकरणे, यादीवर टाका एक नजर)
फीचर
Tecno Pova 4 स्मार्टफोनमध्ये पंच होल कटआऊट डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये काठावर फ्रिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले असून ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हिलियो जी ९९ प्रोसेसर मिळणार असून ८ जीबीची रॅम मिळणार आहे, जी अजून ५ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.
फोनमध्ये ११८ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आली असून दीर्घकाळ काम करण्यासाठी ६ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन निळ्या आणि काळ्या या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे.
(रोज ट्विटर वापरता? ‘या’ ट्रिक्स लक्षात ठेवा, होतील हे फायदे)
भारतासाठीच्या फोनमध्येही हेच स्पेसिफिकेशन्स मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ६.८२ इंचची स्क्रिन असेल आणि ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी आणि व्हिडिओसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. हा फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमसह मिळेल. टेक्नो पोवा ४ च्या ८ जीबी आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत जागतिक स्तरावर १७ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र भारतात त्याची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यात आहे.