Tecno भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी सज्ज आहे. ही कंपनी भारतात ८ फेब्रुवारी रोजी Tecno Pova 5G हा स्मार्टफोन सादर करेल. या स्मार्टफोनमध्ये ६,००० mAh ची मजबूत बॅटरी दिल्याचे बोलले जात आहे. Tecno Pova 5G मध्ये १२० Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरे यांसारखी फीचर्स आहेत. यासोबतच १८ W चे फास्ट चार्जिंग देखील देण्यात आले आहे. Tecno Powa 5G मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येईल जे ११ GB पर्यंत RAM ची क्षमता वाढवू शकते.
ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करताना TECNO मोबाइल इंडियाने या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी लॉंच होणार असल्याची माहिती दिली. यामध्ये रॅम वाढवण्यासाठी फ्युजन टेक्नॉलॉजी जोडण्यात आली आहे. त्याची माहिती शनिवारी जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया त्यात कोणत्या खास गोष्टी दिल्या जात आहेत.
आणखी वाचा : ‘या’ तारखेला लॉंच होऊ शकतो iPhone SE 3, Ipad Air चे डिटेल्स आले समोर, iPhone 11 केवळ ३१,०० रुपयांना
स्पेसिफिकेशन्स
नायजेरियामध्ये लॉंच केलेले, Tecno Pova 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह ६.९५ इंचाचा HD+ (१०८०×२४६० पिक्सेल) डिस्प्ले आहे. हे ८ GB LPDDR5 RAM सह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 900 SoC द्वारे समर्थित आहे. Tecno स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० MP प्रायमरी सेन्सर, २ MP सेकेंडरी सेन्सर आणि AI लेन्स आहे. Tecno Pova 5G मध्ये ड्युअल-एलईडी फ्लॅशसह समोर १६ MP सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय हा फोन १२८ GB UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. हे १८ W चार्जिंग सपोर्टसह ६,००० mAh बॅटरी पॅक देते.
आणखी वाचा : Motorola ने लॉंच केला Moto G Stylus 2022, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Tecno Pova 5G किंमत
Tecno Pova 5G फक्त ८ GB RAM + १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी NGN १२९,०००(अंदाजे रु २३,१००) किंमतीच्या टॅगसह नायजेरियामध्ये लॉंच केले गेले आहे आणि भारतातही हीच किंमत असण्याची शक्यता आहे. हा फोन डॅजल ब्लॅक, पोलर सिल्व्हर आणि पॉवर ब्लू रंगांमध्ये सादर केला जात आहे.