सध्याच्या काळामध्ये आपण सर्वच जण सोशल मीडिया वापरतो. सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन कामामधील एक अविभाज्य घटक बनले आहे. आपण सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्युब, फेसबुक आणि व्हाट्सअॅपचा वापर करतो. या सर्वच अॅप्स आपल्या वापरकर्त्यांसाठी काही ना काही नवीन फीचर्स किंवा नवीन अपडेट आणत असतात. टेलिग्रामला या वर्षातील पहिले अपडेट आले आहे.
टेलिग्राम या मेसेजिंग अॅपला २०२३ मध्ये iOs आणि android प्लॅटफॉर्मवर मोठे अपडेट आलेले आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स असणार आहेत. यात प्रोफाइल पिक्चर मेकरद्वारे वापरकर्त्यांना ऍनिमेटेड ईमोजी त्याच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये बदलता येणार आहे. तर या अपडेटमुळे वापरकर्त्यांना काय काय फायदे होणार आहेत हे जाणून घेऊयात.
Profile Picture Maker
प्रोफाइल पिक्चर मेकरमुळे कोणत्याही स्टिकर किंवा ऍनिमेटेड इमोजीला कोणत्याही अकाउंटमध्ये , ग्रुपमध्ये बदलणे शक्य होणार आहे. हे फिचर फक्त टेलिग्राम प्रीमियम पुरतेच मर्यादित नसून सर्वच वापरकर्ते याचा वापर करू शकणार आहेत. वापरकर्ते त्यांच्या कॉन्टॅक्टस्मध्ये फक्त दोन टॅप मध्ये प्रोफाइल सेट करू शकतात किंवा इतरांना सुचवू शकतात.
Translating Entire Chats
Translating Entire Chats हे फिचर केवळ टेलिग्राम प्रीमियम असणाऱ्या वापरकर्त्यांसाठीच असणार आहे. प्रीमियम असणारे वापरकर्ते ट्रान्सलेट बारवर टॅप करून पूर्ण चॅट्सचे भाषांतर करू शकणार आहेत. दरम्यान नॉन प्रीमियम असणारे वापरकर्ते प्रीमियम भरून हे फिचर वापरू शकणार आहेत.
Emoji Categories
या फीचरमुळे तुम्हाला कोणतेही ईमोजी किंवा मेसेजला त्यावेळच्या परिस्थितीला नुसरून हाहावे असणारे ईमोजी शोधणे सोपे होणार आहे. यामध्ये स्ट्रेकर्स आणि ईमोजी यांचे त्यानुसार ग्रुप करण्यात आले आहेत. वापरकर्ते कोणतेही ईमोजी सेंड करण्यापूर्वी ते होल्ड करू शकतात.
हेही वाचा : Turkey Earthquake: भूकंपग्रस्त टर्कीत Twitter वर बंदी; एलॉन मस्क म्हणाले…
New Custom Emoji and Interactive Emoji
टेलिग्रामने अॅपच्या सुरुवातीलाच विस्तृत अशा कॅटलॉगचा विस्तार करताना टेलिग्रामने कस्टम इमोजीचे १० नवीन पॅक लॉन्च केले आहेत. तसेच काही ईमोजी इंटरॅक्टिव्ह झाले आहेत. ज्यामुळे ते तुम्ही समोरच्यालापाठवू शकता आणि त्यात फुलस्क्रीन इफेक्ट देखील तुम्हाला बघायला मिळतो.