सध्याच्या काळामध्ये आपण सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन कामामधील एक अविभाज्य घटक बनले आहे. आपण सोशल मीडियामध्ये इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामचासुद्धा वापर करतो. हे सर्वच अ‍ॅप्स वापरकर्त्यांसाठी काही ना काही नवीन फिचर्स किंवा नवीन अपडेट घेऊन येत असतात. संवाद साधणे, शॉपिंग, चित्रपट डाउनलोड, ताज्या बातम्या पाहणे आदी अनेक गोष्टींसाठी सर्वाधिक वापरले जाणारे एक अ‍ॅप म्हणजे टेलिग्राम. तर आता टेलिग्राम वापरकर्त्यांसाठी काही हटके फिचर लाँच करणार आहे. या फिचरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. प्रोफाईलसाठी रंग निवडा :

नवीन अपडेटसह, टेलिग्राम आता प्रीमियम सदस्यांना लोगोसह प्रोफाईलसाठीसुद्धा रंग निवडण्याचा पर्याय देते आहे; ज्यामुळे प्रोफाइल आणखीन आकर्षक दिसेल. तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये प्रोफाईल कस्टमाईज करण्यासाठी सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये ‘चॅट सेटिंग हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही ‘रंग बदला’ या पर्यायावर टॅप करा. तसेच आयओएस वापरकर्त्यांनी “Your Colour” हा पर्याय सेटिंगमध्ये शोधा.

२. स्टोरी रिपोस्ट करणे :

टेलिग्राम ॲप अपडेट इतर युजर्सच्या अकाउंट आणि आवडीच्या चॅनेलवरून स्टोरी रिपोस्ट करण्याची परवानगी देणार आहे. वापरकर्ते स्टोरीमध्ये ऑडिओ, मजकूर आणि व्हिडीओ आदी गोष्टी रिपोस्ट करू शकतात. या स्टोरी रिपोस्ट करण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर शेअर ॲरोवर टॅप करा आणि ‘स्टोरी रिपोस्ट करा’ हा पर्याय निवडा. तसेच एखादी व्यक्ती स्वतःच्या स्टोरी कोणी शेअर केल्या पाहिजेत यावर मर्यादा ठेवू शकते. तसेच सगळ्यांसाठी व्हिजीबल असणाऱ्या स्टोरी फक्त रिपोस्ट केल्या जाऊ शकतात.

३. समान चॅनेलची यादी दर्शवणे :

जेव्हा वापरकर्ते ॲपमध्ये एका विशिष्ट चॅनेलमध्ये Join होतात, तेव्हा ॲप वापरकर्त्यांना काही समान चॅनेलची यादी दर्शवेल आणि या यादीमध्ये फक्त तुम्हाला सार्वजनिक चॅनेल दिसतील.

४. विनामूल्य व्हॉइस आणि व्हिडीओ मेसेज ट्रान्सस्क्राईब करा :

प्रीमियम सदस्यांसाठी मर्यादित असलेले ‘व्हॉइस-टू-टेक्स्ट ट्रान्स्क्राइब’ टेलिग्राम फिचर आता विनामूल्य वापरकर्त्यांसाठीसुद्धा घेऊन येत आहे. तसेच ज्या वापरकर्त्यांकडे प्रीमियम नाही, ते दर आठवड्याला फक्त दोन व्हॉइस आणि व्हिडीओ मेसेज ट्रान्सस्क्राईब करू शकतात.

५. स्टोरीवर व्हिडीओ मेसेज पोस्ट करा :

टेलिग्रामने एक नवीन फिचर आणले आहे, ज्यात वापरकर्त्यांना त्यांच्या स्टोरीमध्ये व्हिडीओ मेसेज पोस्ट करण्याचीसुद्धा परवानगी देणार आहेत. तसेच हा व्हिडीओ मेसेज तुम्ही तुमच्या ॲप स्क्रीनवर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता आणि त्याचा आकारही बदलू शकता. तसेच तुम्ही रिपोस्ट केलेल्या स्टोरीवर प्रतिक्रिया देण्यासाठीसुद्धा तुम्ही या फिचरचा वापर करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telegram users experience now repost others story and transcribe message asp
Show comments