एलॉन मस्क हे सध्या ट्विटरचे सीईओ आहेत. आपल्या अनेक निर्णयांमुळे ते कायम चर्चेत असतात. टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी गेल्या दोन वर्षात मोठी रक्कम दान केली आहे. २०२१ आणि २०२२ मध्ये मस्क यांनी एकूण ६४ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती दान केली आहे. २०२२ मध्ये २०२१ च्या तुलनेत कमी संपत्ती दान केली आहे.
२०२२ मध्ये किती केले दान
ट्विटर आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षात $१.९५ बिलियन म्हणजेच जवळजवळ १६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स दान केले आहेत. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) कडे ही माहिती दिसून आली. या फायलिंगनुसार मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सुमारे ११.६ दशलक्ष शेअर्स दान केले. ज्यामध्ये हे शेअर्स कोणत्या संस्थांना दान केले गेले हे सांगण्यात आली नाही. जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीजवळ आता टेस्लाचा जवळजवळ १३ टक्के हिस्सा आहे. कोणत्या धर्मादाय संस्था किंवा धर्मादाय संस्थांना हे दोन देण्यात आले याची माहिती मागवलेल्या ईमेलला टेस्लाने लगेच उत्तर दिले नाही.
२०२१ मध्ये एलॉन मस्क यांनी सुमारे ५.७४ अब्ज डॉलर म्हणजेच ४७ हजार कोटी रुपयांहून अधिकचे दान केले. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मस्क यांनी टेस्ला स्टॉक चॅरिटीला दिले तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण दान केलेल्या शेअर्सवर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही. मस्क यांनी २०२१ मध्ये गिव्हिंग प्लेजवर सही केली होती. याचा अर्थअसा होतो की, अब्जाधीशांना त्यांच्या हयातीत किंवा त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या संपत्तीपैकी किमान अर्धी संपत्ती दान करण्याची आवश्यकता असते.