Tesla Job Offer: विजेवर चालणारी वाहन बनविणारी जगप्रसिद्ध अशा टेस्ला कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. कामही अतिशय सोपे आहे. दिवसाला सात तास चालू शकणाऱ्या उमेदवारांच्या शोधात टेस्ला कंपनी आहे. यासाठी प्रति तास ४८ डॉलर (४,०००) पगार दिला जाणार आहे. टेस्लाकडून ऑप्टिमस हा मानवी रोबोट तयार केला जात आहे. या रोबोटला प्रशिक्षित करण्यासाठी सात तास चालू शकणाऱ्या उमेदवारांची गरज आहे. या कामासाठी उमेदवाराला एका दिवसाचे २८,००० इतके वेतन मिळणार आहे.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी २०२१ साली ऑप्टिमस ही संकल्पना मांडली होती. मानवाप्रमाणेच विविध कामे करू शकणाऱ्या रोबोटची निर्मिती ते करत आहेत. हा रोबोट कारखान्यात काम करण्यापासून ते मानवप्रमाणे अनेक कामे करू शकणार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये टेस्लाने या प्रकल्पाला गती दिली असून विविध पद्धतीने नोकर भरती करून मानवी हालचाली टिपल्या आहेत. जेणेकरून ते रोबोटला प्रशिक्षण देऊ शकतील.

Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
Thane Municipal Administration plans 100 day program to improve citizens daily lives
ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम, कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर

हे वाचा >> क्रिएटिव्ह फोटो काढायचे आहेत? मग तुमच्या iPhone मधील आजच बदला ‘या’ पाच सेटिंग्स…

सध्या टेस्लाने जाहिरात दिलेल्या पदाचे नाव ‘डेटा कलेक्शन ऑपरेटर’ असे आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोशन कॅप्चर सुट आणि व्हर्च्युअल रिॲलिटी ही उपकरणे घालून एका दिवसाला सात तास चालावे लागणार आहे. याशिवाय या उमेदवारांना डेटा ॲनालिसिस, अहवाल लेखन आणि उपकरणासंबंधी छोटी छोटी कामे करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे या कामासाठी काही शारीरिक क्षमता असणे अत्यावश्यक आहे. जसे की, उमेदवाराची उंची ५.७ ते ५.११ फूट या दरम्यान हवी. उमेदवारास ३० पौंड म्हणजेच जवळपास साडे तेरा किलोचे वजन उचलून चालता येणे आवश्यक आहे.

चांगल्या वेतनाशिवाय या पदासाठी इतरही लाभ दिले जाणार आहेत. जसे की, आरोग्य विषयी सुविधा, दात आणि डोळ्यांची तापसणी केली जाईल आणि निवृत्तिसंबंधीचे लाभ दिले जाणार आहेत. टेस्ला बेबीस प्रोग्राम, वजन कमी करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडविणे आणि इतर विम्याचे लाभ उमेदवारांना पहिल्या दिवसांपासून मिळणार आहेत.

हे ही वाचा >> Bill Gates on Steve Jobs: बिल गेट्स यांना स्टिव्ह जॉब्स यांचा हेवा वाटायचा; नव्या पुस्तकातून खुलासा

या पदासाठी प्रति तास २५ ते ४८ डॉलर इतका पगार दिला जाणार आहे. भारतीय रुपयांमध्ये गणना करायची झाल्यास प्रति तास २,२१० ते ४,००० रुपये वेतन मिळणार आहे. उमेदवाराचा अनुभव, कौशल्य आणि तो कुठे राहतो, यावरही वेतनश्रेणी अवलंबून असणार आहे. या पदासाठी रोख पैसे आणि समभागही दिले जाणार आहेत. ज्यांना रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रात काम करायचे आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

टेस्लाने असेही सांगितले की, हे काम शिफ्टमध्ये असणार आहे. सकाळी ८ ते ४.३०, किंवा दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १२.३० पर्यंत आणि रात्री १२ ते सकाळी ८.३० पर्यंत अशा तीन शिफ्टमध्ये काम चालणार आहे. टेस्लाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या करियर या पर्यायावर क्लिक करून अर्ज करता येणार आहे.

Story img Loader