आधुनिक तंत्रज्ञानानं आकाशात गवसणी घातली अन् ती प्रत्येक गोष्ट सोपी झाली. तंत्रज्ञानानं तुम्हालाच तुमचा डॉक्टर बनवलं आणि अश्यक्याचं शक्य करून दाखविलं. इतकं आधुनिक की, तुम्ही कोणाचा जीवही वाचवू शकता. होय, एका स्मार्ट वॉचमुळं बारा वर्षीय मुलीचा जीव वाचला. विश्वास बसत नाहीये ना! मात्र, हे खरंय..चला तर जाणून घ्या हे सत्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे प्रकरण ?

हे प्रकरण अमेरिकेचे सांगितले जात आहे. इमानी माइल्स नावाच्या बारा वर्षीय मुलीला अॅपल स्मार्ट वॉचकडून सतत असामान्य हृदय गतीचे अलर्ट मिळत होते. घड्याळ सतत बीप-बीप आवाज करत होते. असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. यामुळे तिची आई जेसिका किचन यांना हे खूपच विचित्र वाटत होतं. घड्याळामुळे ती सावध झाली. तिच्या आईनं बारिक निरिक्षण केलं असता, तिला आपल्या मुलीची प्रकृती ठीक नसल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. तपासणीत डॉक्टरांना अपेंडिक्समध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे आढळून आलं. तो तिच्या शरीराच्या इतर भागातही पसरला होता. ही मुले फार दुर्मिळ असतात असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढला. शस्त्रक्रियेनंतर सर्व काही ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

आणखी वाचा : आता आधार कार्डद्वारेही घेता येणार मोफत रेशन ; UIDAI ची मोठी घोषणा

आईला अलर्टचा मॅसेज मिळालाच नसता तर…

इमानीच्या आईने सांगितले की, जर अॅपल वॉच नसती तर इमानीचा आजार क्वचितच सापडला असता, कारण रोगाची कोणतीही लक्षणे नव्हती. तिला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला असता तर हा आजार अधिक जीवघेणा ठरू शकला असता.

आपण काय शिकलो…
आधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्टयेपूर्ण अनेक फिचर्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांचा योग्य वापर केला तर आपल्यासाठी वरदानच आहेत. तर चूकीचा वापर केला तर ‘शाप’ आहे. बाजारात इसीजी, हार्ट रेट नोटिफिकेशन, फॉल आणि क्रॅश डिटेक्शन यांसारख्या अनेक वैशिष्ट्येपूर्ण वॉच उपलब्ध आहेत. जे कठीण काळात लोकांसाठी जीवनरक्षक ठरतात. त्यामुळं त्याचा सदुपयोग आपल्या हाती आहे.