टॅलेंटला कोणत्याही पदवीची गरज नसते. सामान्य लोकही अनेकदा असे काम करतात ज्याचा जगाला अभिमान वाटतो. असाच काहीसा प्रकार आसाममधील करीमगंज येथील रहिवासी सम्राट नाथने केला असून त्याने अँटी थेफ्ट ई-सायकल बनवल्याचा दावा केला आहे. या सायकलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, कोणीही ही सायकल चोरण्याचा प्रयत्न करताच, सायकल मालकाच्या फोनवर मेसेज जाऊन अलार्म सक्रिय होईल.

बरेच लोक त्यांचे आवडते व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी युट्युब वापरतात. पण युट्युबवरून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून १९ वर्षीय सम्राटने बनवलेल्या सायकलची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही सायकल कंट्रोल करण्यासाठी सम्राटने एक अ‍ॅप देखील बनवले आहे. त्याने दावा केला आहे की तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सायकलवर नियंत्रण ठेवू शकतो.

विमानात अचानक रडू लागली फ्लाइट अटेंडंट; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल भावुक

जेव्हा सम्राट आठवीमध्ये शिकत होता तेव्हा त्याच्या काकांची सायकल चोरीला गेली. त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती इतकी कमकुवत होती की या चोरीमुळे संपूर्ण घराला मोठा धक्का बसला. तेव्हापासून सम्राटाच्या मनात एकच गोष्ट सुरु होती ती म्हणजे असे एखादे उपकरण बनवावे जेणेकरून सायकल चोरीला जाण्यापासून प्रतिबंध करता येईल. त्यानंतर त्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेतला आणि या उपकरणावर काम सुरू केले.

Netflix ला बसला जबरदस्त धक्का! गेल्या ३ महिन्यात गमावले ‘इतके’ ग्राहक; जाणून घ्या कारण

या विशिष्ट ई-सायकलची वैशिष्ट्ये देखील जबरदस्त आहेत. त्यात जीपीएस बसवण्यात आले असून ही सायकल तीन तासात चार्ज होते. सम्राट म्हणतो की, एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही सायकल ६० किलोमीटरपर्यंत चालू शकते. या अँटी थेफ्ट डिव्हाईसचे सर्किट बनवण्यासाठी सम्राटला यूट्यूबवर खूप संशोधन करावे लागले होते. त्यासाठी तो कोडिंगही शिकला, पण पैशांची कमतरता त्याच्या यशाच्या मार्गात पुन्हा अडथळा ठरत होती. यानंतर सम्राटाने मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात काम करून आपल्या शोधासाठी पैसे वाचवण्यास सुरुवात केली. पगारातून मिळालेल्या पैशातून त्याने एक साधी सायकल विकत घेतली आणि तिचे रूपांतर एका विलक्षण अँटी थेफ्ट ई-सायकलमध्ये केले.

आता त्याच्या सायकलचे पेटंट घेतल्यानंतर सम्राटला त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे आहे. जेणेकरून लोकांना ही उत्तम सायकल परवडणाऱ्या किमतीत बाजारात मिळू शकेल.

Story img Loader