सध्या बाजारात मिळणारी जवळपास सर्व उपकरणे ही आता ‘स्मार्ट’ उपकरणे झाली आहेत. आता आपल्या हातावरील घड्याळ्याचेच उदाहरण घ्या. सुरवातीला केवळ एक चॉकलेटी पट्टा, लहानसे डायल असणारे आणि फक्त वेळ बघण्यासाठी बनवले गेलेले घड्याळ आता किती प्रगत झाले आहे. व्यायाम करताना आपल्या हृदयाचे ठोके मोजणे, दिवसभरात मनुष्य किती पावले चालत आहे इथपासून ते तुम्हाला कुणाचा फोन आला आहे हेसुद्धा त्या लहानश्या घड्याळावर आता पाहता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @beebomco नावाच्या अकाउंटने अजून एका भन्नाट आणि अगदी एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे काम करणाऱ्या आणि घडाळ्यासारख्या दिसणाऱ्या एका डिव्हाईसचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये सोशल मीडिया ते गेमिंग अशा कितीतरी फीचर्सचा वापर, वापरकर्त्याला करता येऊ शकतो असे दिसते. एखाद्या फोनप्रमाणे काम करणाऱ्या आणि स्मार्टवॉचसारख्या दिसणाऱ्या या भन्नाट उपकरणाचे नाव काय आणि त्यामध्ये नेमके कोणते अॅप्स आणि फीचर्स वापरता येऊ शकतात ते पाहूया.

हेही वाचा : केवळ ‘आवाजावर’ लिहिले जाणार E-mail? Draft with voice फीचर नेमके कसे काम करू शकते, जाणून घ्या….

  • ‘Fire-Boltt Dream WristPhone’ असे आहे या हातावर लावणाऱ्या रिस्ट फोनचे नाव आहे.
  • यामध्ये तुम्ही प्ले स्टोरवर दिसणारे सर्व अॅप्स वापरू शकता. तसेच कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करू शकता.
  • इतकेच नव्हे तर यामध्ये चक्क 4G LT सिमकार्ड घालू शकता. सिमकार्ड घातल्याने तुम्ही हातावर लावलेल्या रिस्टफोन वरून एखाद्याला सहज फोन लावू शकता.
  • तसेच, वायरलेस हेडफोनला हे डिव्हाईस कनेक्ट करता येऊ शकते. इतकेच नाही ते लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसाठी वापरल्या जाणाऱ्या माउसलादेखील कनेक्ट करू शकतो.
  • मॅप्स पाहणे, गाणी ऐकणे, व्हिडीओ पाहणे यांसारख्या सर्व गोष्टी तुम्हाला या लहानशा फोनमधून करता येऊ शकतात.
  • या सर्व गोष्टी करण्यासाठी यामध्ये फायफाय [wifi], ब्लूटूथसारख्या सोई देण्यात आलेल्या आहेत. तसेच या रिस्टफोनमध्ये अँड्रॉइड असून, इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो.

रिस्टफोन स्क्रीन, डिस्प्ले आणि स्पेसिफिकेशन्स

  • या स्मार्टवॉचसारख्या दिसणाऱ्या रिस्टफोनमध्ये २.०२” क्रिस्टल क्लिअर स्क्रीन बसवली आहे. अतिशय सहजतेने काम करण्यासाठी ६०Hz रिफ्रेश रेट, ६०० nits ब्राईटनेस आणि ३२०*३८६ रिझोल्यूशन देण्यात आलेले आहे.
  • स्टोरेज आणि रॅमबद्दल बोलायचे झाले तर, या लहानश्या रिस्टवॉचमध्ये १६GB स्टोरेज आणि २GB रॅम देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये Cortex Quad Core CPU बसवलेला आहे.
  • एकदा चार्ज केल्यानंतर ३ दिवस डिव्हाईस चालण्यासाठी, ८००mAh इतक्या शक्तीची बॅटरी बसवली आहे.
  • अर्थातच मॅप्स पाहण्यासाठी जिपीएस, मीडिया शेअर करण्यासाठी ब्ल्यूटुथ आणि ऑनलाईन सर्फिंगसाठी इंटरनेट व वायफाय अशा सर्व सुविधा, या हातावर घड्याळाप्रमाणे दिसणाऱ्या स्मार्ट रिस्ट फोनमध्ये दिलेल्या आहेत.
  • इतकेच नव्हे तर, इतर स्मार्टवॉचप्रमाणे यामध्ये तुम्हाला तुमच्या फिटनेसचाही ट्रॅक ठेवता येतो.

हेही वाचा : फ्लिपकार्टवरून मागवला आयफोन, मात्र ग्राहकासोबत झाला Scam; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

किंमत

या अत्यंत उपयुक्त आणि एखाद्या घड्याळाप्रमाणे दिसणरा हा रिस्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असून, सध्या त्याची किंमत ७,४९९ रुपये इतकी दिसत आहे.

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या भन्नाट डिव्हाईसबद्दल माहिती देणाऱ्या व्हिडीओला आत्तापर्यंत ३.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fire bolt wrist phone that looks like a smartwatch is the most amazing and mind blowing device check out dha
Show comments