Facebook Reels Time Limit Increased: मेटाकडून नुकतेच आपल्या फेसबुकवरील क्रिएटर्ससाठी काही नवीन ‘क्रिएटिव्ह एक्सप्रेशन’ फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. नवीन फीचर्स आणल्यानंतर फेसबुकवर रील्स बनवणाऱ्यांची आता मज्जाच मजा आहे. फेसबुकने रीलची वेळ मर्यादा वाढवली आहे. Reels क्रिएटर्स आता फेसबुकवर ९० सेकंदाचे व्हिडीओ तयार करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूर्वी वापरकर्त्यांना फेसबुकवर रील्स तयार करण्यासाठी फक्त ६० सेकंद मिळायचे. मात्र आता कंपनीकडून मेटा फॉर क्रिएटर्स अकाउंटद्वारे या प्रमुख अपडेटबाबत घोषणा करण्यात आली आहे.  वेळेची मर्यादा वाढल्याने क्रिएटर्सना आणखी एक मोठे वैशिष्ट्य मिळाले आहे. आता क्रिएटर्स त्यांच्या फोनच्या मेमरीमधून सहजपणे तयार रील्स तयार करू शकतात. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एखादा व्हिडीओ सेव्ह केला असेल, तर तो Reels वरही अपलोड केला जाऊ शकतो.

(हे ही वाचा : पुन्हा मिळणार नाही संधी! एकही पैसा खर्च न करता घरी न्या दोन जबरदस्त 5G स्मार्टफोन, फक्त ‘येथे’ मिळत आहे ऑफर)

फेसबुकची हे दोन्ही फीचर्स Instagram मधील फीचर्स सारखेच काम करतात. कंपनीने नवीन ग्रूव्ह वैशिष्ट्य देखील सादर केले आहे, जे आपोआप वापरकर्त्यांच्या व्हिडीओमधील मोशनला गाण्याच्या तालावर सिंक करते. नवीन टेम्प्लेट्स टूलसह, वापरकर्ते ट्रेंडिंग टेम्प्लेट्ससह सहजपणे रील तयार करू शकतात.