सध्या वायरलेस एअरपॉड्सची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी त्यांच्या जास्त काळ टिकणाऱ्या बॅटरी लाइफसह ग्राहकांसाठी एअरपॉड्स घेऊन येत असतात. अशातच या सगळ्या कंपन्यांमध्ये ॲपल एअरपॉड्स खूप जास्त महाग असतात. पण, ग्राहकांना उत्तम ऑडिओचा लाभ घेता यावा यासाठी यात अनेक फीचर्सदेखील असतात. तर आता कंपनी ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहे. आगामी एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना कॅमेरा देण्यात येणार आहे; ज्याचे डिव्हाइसला स्पर्श न करताही नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे.
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार Apple AirPods बऱ्याच नवीन फीचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. उद्योग विश्लेषक मिंग-ची कुओ सुचवितात की, पुढील पिढीचे म्हणजेच २०२६ मध्ये लाँच होणाऱ्या एअरपॉड्समध्ये कॅमेरा असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना व्हिजन प्रो व संगणकासह डिझाइन बदल एकत्रितपणे करणे शक्य होईल. आगामी एअरपॉड्स वेगळे दिसतील की स्वाक्षरीचे एअरपॉड्स डिझाइन पुढे चालू ठेवतील हे सध्या अस्पष्ट आहे. त्याआधी फेब्रुवारीमध्ये ब्ल्यूमबर्गनेदेखील अशाच एका विकासाची नोंद केली होती.
नेमकं कसं करेल काम?
तर २०२६ मध्ये लाँच होणाऱ्या एअरपॉड्समध्ये फेसआयडी रिसिव्हर सेटअपप्रमाणे कॅमेरा हार्डवेअर असेल. त्यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर आहे; जो ऑडिओ अनुभव देऊन व्हिडीओ पाहणाऱ्या ग्राहकांचा अनुभव आणखीन खास करील. आगामी एअरपॉड्स कशा प्रकारे डिझाइन करण्यात येतील याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली आहे. त्याशिवाय कॅमेरा हार्डवेअर पर्यावरणीय बदल शोधण्यात कॅपेबल असेल आणि युजर्स एअर जेश्चरचा वापर करून, एअरपॉड्सला स्पर्श न करताही नियंत्रण करू शकतील. तसेच दरवर्षी कंपनीने १० दशलक्ष एअरपॉड्साठी १८ ते २० दशलक्ष सेन्सर तयार केल्याची नोंद झाली आहे.
ॲपल एअरपॉड्स (Apple AirPods) हे आयफोन ७ (iPhone 7) सीरिजबरोबर सादर केलेले, जगभरातील सर्वांत लोकप्रिय वायरलेस इअरफोन आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, ॲपलने एअरपॉड्समध्ये अनेक नवीन फीचर्ससह सुधारणा केल्या गेल्या आहेत आणि नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC)मध्ये नवीन कॅमेरा हार्डवेअरसह, Apple त्यांना व्हिजन प्रोशी सुसंगत काहीतरी नवीन घेऊन येण्याचा मार्ग कंपनी शोधत आहे.