Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition Phone to Launch: Realme आपला नवीन Coca-Cola स्पेशल एडिशन फोन ‘Realme 10 Pro 5G’ भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी हा स्पेशल एडिशन फोन भारतात १० फेब्रुवारीला लाँच करणार आहे. Realme 10 Pro 5G फोन भारतात डिसेंबर 2022 मध्ये लाँच झाला होता.
काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार अशी माहिती आली होती. आता समोर आलं आहे की, हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. माहितीनुसार, कंपनी Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition चे ६,००० फोन विकणार आहे. Realme ने या गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की प्रत्येक फोन ग्राहकांना “विशेष आणि अद्वितीय” मर्यादित क्रमांकाच्या कार्डसह विकला जाईल.
(हे ही वाचा: मोबाईल होणार स्वस्त, ५ जी सेवेसाठी देशात १०० लॅब, अर्थसंकल्पात तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणखी काय तरतूद? जाणून घ्या)
Realme Coca-Cola Edition रेड, ब्लैक कलर कॉम्बिनेशन
ट्विटरवर मायक्रोब्लॉगिंग साइटवर @Colaphoneglobal नावाचे खाते तयार केल्यानंतर, कोलाफोनच्या लवकर लाँचिंग आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दलच्या अटकळांना जोर आला होता. Realme आणि Coca-Cola च्या भागीदारीमुळे, बाजारात येणार्या नवीन फोनबद्दल असा अंदाज बांधला जात होता की तो पूर्णपणे लाल रंगाचा असेल. या आगामी फोनमध्ये, Realme किंवा Oppo च्या सर्वोत्तम फोनची झलक मिळण्याची अपेक्षा होती. नवीन फोनमध्ये लाल आणि काळ्या रंगाची छटा आहे. Realme ने सांगितले की, नवीन फोनमध्ये कलरचे प्रमाण ७०:३० आहे. म्हणजेच, ७० टक्के लाल रंगाची छटा आहे आणि ३० टक्के काळा आहे. शीतपेय बनवणाऱ्या कंपनीचा प्रसिद्ध लोगो फोनवर सर्वत्र दिसतो. फोनच्या मागील भागाला खास लुक (मॅट फिनिश) देण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, फोन खास डिझाईन करण्यात आला आहे, ज्यामुळे हा फोन स्क्रॅच आणि फिंगरप्रिंट्सपासून वाचवेल.
हा स्मार्टफोन कसा असेल खास
नवीन Realme 10 Pro 5G मध्ये ८GB RAM आहे, अंतर्गत स्टोरेज क्षमता कंपनीने अद्याप उघड केलेली नाही. Realme 10 Pro हँडसेटचा डिस्प्ले आकार ६.७२ इंच आहे, LCD स्क्रीन १०८० पिक्सेल रिझोल्यूशन आणि १२०Hz रिफ्रेश रेट आहे. यामध्ये २४०Hz चे टच सॅम्पलिंग देखील दिसत आहे. या फोनमध्ये, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६MP फ्रंट कॅमेरा आहे आणि यासाठी डिस्प्लेच्या मध्यभागी एक होल पंच कट आउट दिसू शकतो. फोनच्या आतील भागात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन Android १३ वर आधारित Realme UI ४.० ऑपरेटिंग सॉफ्टवेअरवर काम करतो.
(हे ही वाचा: केवळ ‘इतक्या’ रुपयांत व्हा iPhone चे मालक! ‘Flipkart’ वर घसघशीत ऑफर; जाणून घ्या सविस्तर )
स्मार्टफोनची किंमत
फोटोग्राफीच्या बाबतीत, Realme 10 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये १०८MP प्राथमिक कॅमेरा आणि २MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. फोनमध्ये ५,०००mAh बॅटरी आहे. ज्यामध्ये चार्जिंगसाठी ३३W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Realme 10 Pro फोनच्या ६GB + १२८GB व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. या फोनचा ८GB + १२८GB व्हेरिएंट बाजारात १९,९९९ रुपयांना विकत घेता येईल. आतापर्यंत कंपनीने आपल्या नवीन हँडसेट Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition ची भारतात किंमत जाहीर केलेली नाही.