Tecno has launched its first foldable phone in India: गेल्या काही वर्षात फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ वाढत चालली आहे. आता Tecno ने नुकताच आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold लाँच केला आहे. Tecno Phantom V Fold स्मार्टफोनला कंपनीने दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. हा फोन सॅमसंग, विवो, ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देणार असल्याच बोललं जात आहे. एकीकडे सॅमसंगचे फोल्डेबल स्मार्टफोन खूपच महाग आहे तर दुसरीकडे टेक्नोच्या या स्मार्टफोनची किंमत सॅमसंग पेक्षा अर्धीच आहे.
Tecno Phantom V Fold स्मार्टफोनमध्ये काय आहे खास?
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये पाच कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. मागच्या बाजूला ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा असून दुसरा ५० एमपी २x झूम कॅमेरा आणि १३ एमपी अल्ट्रावाईड कॅमेरा आहे. तर पुढच्या बाजूस दोन सेल्फी कॅमेरे आहेत. १३ एमपीचा फ्रंट स्क्रिनवर आणि १६ एमपीचा आतमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली असून ४५w फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली जी७१० जीपीयू आहे. हा टेक्नो फोन LPDDR5X RAM आणि UFS ३.१ storage टेक्नॉलॉजीवर चालतो. अँड्रॉइड १३ सह हा फोन हायओएस फोल्ड व्हर्जनवर चालतो.
(हे ही वाचा: तुमचा Wi-Fi रात्रीही सुरु असतो काय? किती धोकादायक आहे ते जाणून घ्या, अन्यथा भोगावे लागेल मोठे नुकसान )
Fantom V Fold 5G मध्ये ७.८५ 2K+ एलटीपीओ डिस्प्ले दिला आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप डायमेनसिटी ९०००+ चिपसेट देण्यात आला आहे. यामध्ये १२ GB रॅम आणि ५१२GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Tecno Phantom V Fold स्मार्टफोन किंमत
स्मार्टफोनला अमेझॉनवरून खरेदी करता येऊ शकते. या फोनचा सेल १२ एप्रिल पासून सुरू झाला आहे.Tecno Phantom V Fold स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत ८८,८८८ रुपये ठेवण्यात आली आहे, तर टॉप मॉडेलसाठी ९९,९९९ रुपये मोजावे लागतील.